नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:33 IST2018-10-25T23:33:18+5:302018-10-25T23:33:22+5:30

नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सेवा दृष्टिपथात आली आहे.

 Successful test of locals on Nerul-Uran road | नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

नवी मुंबई : नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सेवा दृष्टिपथात आली आहे. रेल्वे व सिडकोच्या पथकाने गुरुवारी या मार्गावर प्रत्यक्ष लोकल चालवून चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली असून, पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.
नेरूळ-उरण लोकलमुळे या पट्ट्यातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी केली होती. त्यानंतर गेल्या शुक्रवारी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने नेरूळ-खारकोपर-बेलापूर मार्गाची चाचणी घेतली होती. गुरुवारी या मार्गावर प्रत्यक्षात बारा डब्यांची लोकल चालविण्यात आली. या वेळी रेल्वेच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी आणखी काही चाचण्या करावयाच्या आहेत. एकूणच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या संमती नंतरच नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल प्रत्यक्षात धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

Web Title:  Successful test of locals on Nerul-Uran road