शुभमचा यशस्वी समुद्र प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 02:17 IST2016-02-17T02:17:28+5:302016-02-17T02:17:28+5:30

नेरूळमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम वनमाळी या तरुणाने नवी मुंबई शहराच्या शिरपेचायत मानाचा तुरा रोवला

The successful sea journey of Shubham | शुभमचा यशस्वी समुद्र प्रवास

शुभमचा यशस्वी समुद्र प्रवास

नवी मुंबई : नेरूळमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम वनमाळी या तरुणाने नवी मुंबई शहराच्या शिरपेचायत मानाचा तुरा रोवला. स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांना जोडणाऱ्या जिब्राल्टरची सामुद्रधुनी अवघ्या ३ तास १६ मिनिटांमध्ये पार करून विश्वविक्रम केला. शुभमच्या या १६.७ कि.मी. प्रवासाची नोंद सोमवारी लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून, यापूर्वी ३ तास २० मिनिटांच्या विक्रमाला जिद्दीने टक्कर देऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अशा प्रकारचा विश्वविक्रम करणारा हा मुंबई शहरातील पहिलाच जलतरणपटू असून, सर्वच स्तरामधून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
यापूर्वी २१ जानेवारी २०१४ ला शुभमने धरमतर ते गेट वे आॅफ इंडिया हा प्रवास १२ तास ४२ मिनिटांत पार करून जलतरणाच्या कसबाने नवी मुंबई शहराचे नाव उंचावले होते. जिब्र्राल्टरची सामुद्रधुनी तेरेफा (स्पेन) त मोरक्को (साऊथ आफ्रिका) असा दुहेरी प्रवास सलग पोहून पार केला. शुभमच्या या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे डोवर, लंडन ते तेरेफा स्पेनपर्यंत सलग १२ तासांच्या प्रवासानंतर त्वरित या प्रवासाला सुरुवात केली होती. विविध अडचणी व परिस्थितींवर मात करून १५ डिग्री अंश सेल्सिअस अशा थंड प्रदेशातील पाण्यात पोहून त्यांने जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू होण्याचा मान मिळविला. शार्क व व्हेल यांसारख्या जलचरांची भीती असूनही शुभमने न डगमगता सलग पोहून जिद्दीने जलप्रवास पूर्ण केला. जोराने वाहणारे वारे, बदलता सागरीप्रवाह अशी आव्हाने पेलली.पोहताना प्रदूषित पाणी, मासे, लाटा, वाऱ्याचा वेग, शारीरिक इजा या सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतो. यशाचे शिखर गाठण्यासाठी या अडथळ््यांक डे दुर्लक्ष करून माझा जलप्रवास मला यशस्वीरीत्या कसा पारकरता येईल, याकडे लक्ष केंद्रित करतो.
- शुभम वनमाळी, जलतरणपटू

Web Title: The successful sea journey of Shubham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.