शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग; नव्या वर्षात १७ एप्रिलपासून प्रवासी, कार्गो सेवेचा होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 06:28 IST

मार्चपर्यंत मिळणार आवश्यक त्या सर्व परवानग्या...

नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ‘इंडिगो ए ३२०’ या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. विमानाचे लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

नवीन वर्षात या विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी आणि कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी विमानतळावर ‘सुखोई’ या लढाऊ विमानाचे लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर रविवार, २९ डिसेंबर रोजी इंडिगोचे विमान उतरविण्यात आले. यावेळी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जून उजाडणार  १७ एप्रिल २०२५ पासून  देशांतर्गत विमानसेवेचे उद्घाटन  होईल. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.चे  मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. व्ही. जेके शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

विमानाला वॉटर सलामीइंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी प्रथेप्रमाणे  ऑस्ट्रेलिया बनावटीच्या दोन अग्निशमन बंबांमधून विमानाला वॉटर सलामी देण्यात आली.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईairplaneविमान