यशस्वी शेती उद्योजिका
By Admin | Updated: March 8, 2017 04:41 IST2017-03-08T04:41:23+5:302017-03-08T04:41:23+5:30
आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे मुलगी हे ‘परक्याचे धन’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर वारस म्हणून मुलाचेच नाव पुढे के ले जाते. मात्र, अंजली चुरी

यशस्वी शेती उद्योजिका
- अंजली भुजबळ
आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे मुलगी हे ‘परक्याचे धन’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर वारस म्हणून मुलाचेच नाव पुढे के ले जाते. मात्र, अंजली चुरी यांनी त्यांचे वडील भालचंद्र पाटील यांचा वारसा पुढे चालवला आहे. ते ठाणे जिल्ह्यातील कुसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक संधोधने के ली आणि हाच शेती क्षेत्राचा वारसा अंजली चुरी या गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून चालवित आहेत.
आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने शेती के ली जाते. मात्र, या पिकांना हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरीही अनेक वेळा खचून जातो. यावर पर्याय असणे गरजेचे आहे. या विचारातून शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचे ध्येय बाळगून त्यांनी १९९२पासून कामाला सुरुवात के ली. यामध्ये त्यांना त्यांचे पती मकरंद चुरी यांनी मोलाची साथ दिली.
सुरुवातीला त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील त्यांच्या शेतात देशी आणि विदेशी (एक्झॉटिक) भाज्या पिकविण्यास सुरुवात के ली. कारण, विदेशी भाज्या आपल्या देशात येथील वातावरणात पिकविणे तसे मोठे आव्हानच होते, त्यांनी ते समर्थपणे पेलले.त्या एक्झॉटिक भाज्या ताज महल, ओबेरॉय आणि प्रेसिडेन्ट या तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये देण्यास सुरुवात
के ली. कालांतराने याएक्झॉटिक भाज्यांची मागणी वाढली. यानंतर त्यांनी आपल्या देशातील विविध ठिकाणच्या हवामानात कोणत्या भाज्या पिकू शकतात, याचा अभ्यास करून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या शेतकऱ्यांचे जाळे विणले.१९९७ला निसर्ग निर्माण या
कं पनीची स्थापना के ली. आजघडीला त्यांनी ६०० ते ८०० शेतकऱ्यांना उभे के ले आहे. त्या शेतकऱ्यांना एक्झॉटिक भाजी कशी पिकवायची, त्यांचे पॅकिंग कसे करायचे? याचे प्रशिक्षण दिले. अशा प्रकारच्या शेतीमुळे चांगले उत्पादन मिळतेय, यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. आज त्या पॅशन फ्रूट, कीवी, मॉग्रुन, ड्रॅगन फ्रूट अशा विदेशी फळांच्या उत्पादनाकडे लक्ष पुरवित आहे. नवीन पिढीने या शेती क्षेत्राला करिअर म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे अंजली चुरी यांचे मत असून त्या यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा वारसा त्यांची मुलगी सायली पुढे चालवत आहे. सायलीने बायोके मेस्ट्रीची पदवी घेतली त्यानंतर फ्रूड सायन्स अॅण्ड क्वॉलिटीकंट्रोलचा डिप्लोमा करून पालकांना या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. फॅमिली मॅनज्डे बिझनेस मॅनेजमेंट केले. लग्नानंतर सायली विदेशात आहे. मात्र, भारतातील शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचे हा संकल्प करून मिशीगन युनिव्हर्सिटीत शिकत असून सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचा अभ्यास करत आहे. लवकरच भारतात येऊन शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करण्याचा तिचा मानस आहे.
करिअर म्हणून
शेतीचा विचार करा
शेती क्षेत्राला ग्लॅमर नाही, त्यामुळे तरु ण पिढी याकडे पाठ फिरवत आहे. मात्र, या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणे गरजेचे आहे.
आज एक्झॉटिक व्हिजिटेबलमध्ये उच्चशिक्षित तरुण आहेत आणि ते चांगल्या प्रकारे यामध्ये काम करीत आहेत. तेव्हा शेतीचा विचार आजच्या पिढीने करणे गरजेचे आहे.
याचबरोबर रासायनिकपेक्षा आॅरगॉनिक आणि नॅचरल पद्धतीचा आवलंब करणे गरजेचे आहे, असे अंजली चुरी यांचे मत आहे.
महिलांचे योगदान
‘शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये अनेक गुणवत्ता आहेत. महिला या लहान बाळाचे संगोपन फार व्यवस्थित आणि जबाबदारीने करतात. त्यामुळे प्रोडक्शनमध्ये महिलांनी काम करावे,तर पुरुषांनी मार्केटिंगमध्ये काम केल्यास ही चैन पूर्ण होईल,’ असे अंजली चुरी म्हणाल्या.
मिळालेले पुरस्कार
१. मराठी व्यापारी यशस्वीनी
२.सह्याद्री वाहिनी कृ षी सन्मान
३.जिजामाता कृ षीभूषण