मोहोपाड्याच्या प्रणवला यूपीएससीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:57 IST2018-04-29T06:57:19+5:302018-04-29T06:57:19+5:30
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या (यूपीएससी) केंद्रीय स्तरावरील परीक्षेत, रायगड जिल्ह्यातील नवीन पोसरी (मोहोपाडा) येथील प्रणव अनंत कानिटकरने यश संपादन केले असून, त्याला यूपीएससीत १६६वी रँक मिळाली.

मोहोपाड्याच्या प्रणवला यूपीएससीत यश
जयंत धुळप
अलिबाग : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या (यूपीएससी) केंद्रीय स्तरावरील परीक्षेत, रायगड जिल्ह्यातील नवीन पोसरी (मोहोपाडा) येथील प्रणव अनंत कानिटकरने यश संपादन केले असून, त्याला यूपीएससीत १६६वी रँक मिळाली.
प्रणवने बारावीपर्यंतचे शिक्षण रसायनी-मोहोपाडा येथील जे.एच.अंबानी स्कूलमधून पूर्ण केले. पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून बी.ए. पदवी संपादन केल्यावर पुण्याच्याच गोखले इन्स्टिट्यूूटमधून इकॉनॉमिक्स विषयात एम.ए. केले. यूपीएससीकरिता त्याचा हिंदी साहित्य हा अतिरिक्त विषय होता. दरम्यानच्या काळात तो गुरगाव येथे अॅनालिटिकल सेवेत नोकरी करीत होता. नोकरी करत असताना त्याने यूपीएससीचा अभ्यास केला. प्रणवचे वडील अनंत कानिटकर मोहोपाडा-रसायनी औद्योगिक वसाहतीतील बॉम्बे डाइंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर आई अनघा या व्यवसायाने वकील आहेत.