‘तहेलका’वर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: August 18, 2015 23:28 IST2015-08-18T23:28:39+5:302015-08-18T23:28:39+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह छायाचित्र व मजकूर प्रसिध्द करणाऱ्या ‘तहेलका’ मासिकावर गुन्हा दाखल करावा,

‘तहेलका’वर गुन्हा दाखल करा
पनवेल : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह छायाचित्र व मजकूर प्रसिध्द करणाऱ्या ‘तहेलका’ मासिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पनवेलच्या शिवसैनिकांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पोलिसांकडे केली. यासंदर्भात मंगळवारी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले. सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ते स्वीकारले.
‘तहेलका’ने बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र दहशतवाद्यांबरोबर प्रसिध्द करून तमाम जनतेचा अवमान केला असून समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. हे चुकीचे छायाचित्र आणि मजकुराचे पडसाद राज्याबरोबरच संपूर्ण देशात उमटले आहेत. त्यामुळे ‘तहेलका’ मासिकाबरोबरच त्याचे मालक, प्रकाशक व संपादकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. यावेळी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.