माणगावच्या विद्याथ्र्याना पाहावी लागते एसटीची वाट
By Admin | Updated: October 30, 2014 22:27 IST2014-10-30T22:27:08+5:302014-10-30T22:27:08+5:30
माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी कॉलेजच्या वेळेवर बसेस येत नसल्याने विद्यार्थीवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.

माणगावच्या विद्याथ्र्याना पाहावी लागते एसटीची वाट
गोरेगाव : माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी कॉलेजच्या वेळेवर बसेस येत नसल्याने विद्यार्थीवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.
विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी माणगाव व महाड आगारातून काही एसटी सोडल्या जातात, मात्र बसेस वेळेवरती नसणो, एसटी संख्या कमी, चालक-वाहकांची उडवाउडवीची वागणूक, एसटीची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, विशेष म्हणजे रोजच्या रोज असणा:या समस्यांकडेही कुणी गांभीर्याने पाहत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. सद्यस्थितीत माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा या शहरी तसेच ग्रामीण भागातून विद्यापीठात पदवी व पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकायला दररोज सातशे ते साडे सातशे विद्यार्थी जात असतात. रोह्यावरून तसेच माणगाव आगारातून सकाळी सव्वाआठ वाजता रोह्यावरून सुटणारी व सव्वादहा वाजता सुटणा:या अशा दोनच बसेस या मार्गावरून सोडल्या जातात. परंतु परिसरातील विद्याथ्र्याच्या तुलनेत बसेसची संख्या अतिशय कमी आहे. एसटीने प्रवास करणो सोयीस्कर असल्याने बहुतेक विद्यार्थी पासेस काढतात, मात्र बसने नीट प्रवासही करता येत नसल्याने विद्यार्थी संतापत आहेत.
विशेष म्हणजे मुंबई - गोवा महामार्गावरून माणगाव तसेच महाड, चिपळूणकडे जाणारी बस मिळेल म्हणून काही विद्यार्थी लोणोरे फाटय़ावर येतात, मात्र लांब पल्ल्याच्या एसटीचे वाहक पासधारक विद्याथ्र्याना गाडीत घेत नाहीत, असे विद्याथ्र्याचे म्हणणो आहे. कधीकधी तर नजीकच्या डेपोच्या बसेस रद्द होतात. (वार्ताहर)