घणसोलीत विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: March 12, 2017 02:50 IST2017-03-12T02:50:44+5:302017-03-12T02:50:44+5:30

घणसोली येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तिच्या

Student Suicide Of Ghansaloli | घणसोलीत विद्यार्थिनीची आत्महत्या

घणसोलीत विद्यार्थिनीची आत्महत्या

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. घरात कोणीच नसताना तिने आत्महत्या केली आहे.
स्वाती यादव (१६) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अकरावीची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी सकाळी तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी तिची लहान बहीण घरी आली असता, घर आतमधून बंद असल्याने तिने शेजारच्यांना कळवले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, स्वातीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण पोलिसांना कळू शकलेले नाही. यानुसार तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Student Suicide Of Ghansaloli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.