गोमांस वाहतूक करणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: February 22, 2016 00:33 IST2016-02-22T00:33:09+5:302016-02-22T00:33:09+5:30
बेकायदा गोमांस वाहतूक प्रकरणी वाशी व खारघर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.

गोमांस वाहतूक करणाऱ्यांना अटक
नवी मुंबई : बेकायदा गोमांस वाहतूक प्रकरणी वाशी व खारघर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.
वाशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० किलो वजनाचे प्राण्यांचे मांस जप्त करण्यात आले आहे. बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख महावीर जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना टेम्पोतून गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार सायन-पनवेल मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची पोलिसांमार्फत झाडाझडती घेतली जात होती.
या दरम्यान सुमो जीप (एमएच १४ बीके २१२१) मधून मुंबईत नेले जाणारे जनावरांचे मांस पोलिसांच्या हाती लागले. त्यानुसार सुमो चालक मोहम्मद कुरेशी (३५) व मुमताजअली मुल्ला (५१) या दोघांना अटक केली आहे. खारघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. खारघर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून मुंबईकडे जाणारे तीन टेम्पो ताब्यात घेतले. या टेम्पोतून तब्बल १८00 किलो गोमांस जप्त करण्यात आल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)