पेण पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
By Admin | Updated: November 1, 2014 22:32 IST2014-11-01T22:32:30+5:302014-11-01T22:32:30+5:30
कोंडवाडय़ातील गाळा आज पेण नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पालिकेचे मुख्य अधिकारी प्रल्हाद शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली.

पेण पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
पेण : नगरपालिकेच्या मालकीचा पंढरीनाथ परशुराम पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कोंडवाडय़ातील गाळा आज पेण नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पालिकेचे मुख्य अधिकारी प्रल्हाद शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली. यावेळी पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या कोंडवाडय़ातील गाळा पुन्हा ताब्यात घेऊन पालिकेच्यावतीने या गाळय़ावर सील ठोकण्यात आले.
पेण नगरपालिकेच्या या कोंडवाडय़ात पंढरीनाथ परशुराम पाटील यांचे मटण व चिकन विक्री सेंटर होते. या गाळय़ाबाबत पंढरीनाथ पाटील यांना पेण नगरपालिका प्रशासनाने 29 सप्टेंबर रोजी सदरचा गाळा खाली करून पालिकेच्या ताब्यात देण्याबाबत नोटीस पाठविली होती. त्या नोटिसीला पाटील यांनी पेण येथील दिवाणी न्यायालयात व त्यानंतर अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. पेण न्यायालयातील दावा कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात गेलेले अपील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. मुदत संपल्यानंतरही गाळय़ातील सामान व गाळा खाली करण्याबाबत पाटील यांनी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे अखेर आज दुपारी पेण पालिका मुख्याधिकारी प्रल्हाद शेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सदरचा गाळा ताब्यात घेण्यासाठी धडक कारवाई करण्यास गेले असता तेथील कार्यरत माणसांनी सामानसुमान बाहेर काढून अखेर गाळा ताब्यात घेतला. (वार्ताहर)
4सदरच्या गाळय़ाच्या मुख्य दरवाजाला पत्रे ठोकून त्यावर सीलबंद ठोकून कार्यवाही थांबविली. पालिका प्रशासनाने 4क् कर्मचारी व 2क् मे 25 पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. मात्र या वेळी शांततापूर्वक सहकार्य दोन्ही बाजूंकडून झाल्याने पालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
4अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सदरचा गाळा ताब्यात घेण्यासाठी धडक कारवाई करण्यास गेले असता तेथील कार्यरत असलेल्या माणसांनी सामानसुमान बाहेर काढून सायंकाळी 4.3क् वा़ सदरचा गाळा खाली करून पालिकेच्या ताब्यात घेण्यात आला.