केंद्राच्या 287 कोटींतून पंचायतराजला बळकटी

By Admin | Updated: December 11, 2014 02:08 IST2014-12-11T02:08:03+5:302014-12-11T02:08:03+5:30

राज्यातील 33 जिल्ह्यांना केंद्र सरकारने तेराव्या वित्त आयोगांतर्गत परफॉर्मन्स ग्रॅण्टअंतर्गत 287 कोटी 87 लाख 15 हजारांची भरघोस मदत दिली

Strengthening Panchayat Raj Through Center's 287 crores | केंद्राच्या 287 कोटींतून पंचायतराजला बळकटी

केंद्राच्या 287 कोटींतून पंचायतराजला बळकटी

नारायण जाधव ल्ल ठाणो
पंचायतराज संस्थांच्या बळकटीकरणासाठी ठाणो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील चार जिल्ह्यांसह राज्यातील 33 जिल्ह्यांना केंद्र सरकारने तेराव्या वित्त आयोगांतर्गत परफॉर्मन्स ग्रॅण्टअंतर्गत 287 कोटी 87 लाख 15 हजारांची भरघोस मदत दिली असून हा निधी जि़प़ला 1क् टक्के, पंचायत समित्यांना 2क् टक्के तर ग्रामपंचायतींना 7क् टक्के असा विभागून मिळणार आह़े 
ग्रामविकास विभागाने त्या-त्या जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना हा निधी वितरीत केल्यानंतर त्यांनी तो 5 ते 1क् दिवसांच्या आत संबंधित पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा न केल्यास रिझव्र्ह बँकेच्या नियमानुसार व्याज द्यावे, असे ग्राम विकास विभागाने त्यांना बजाविले आह़े 
यानुसार, ठाणो जिल्ह्याला 1क् कोटी 2क् लाख,  रायगडला सात कोटी 11 लाख, रत्नागिरीस सहा कोटी 73 लाख 21 हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यास चार कोटी 84 लाख 71 हजारांची मदत मिळणार आह़े विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदांनी या निधीची येत्या 31 मार्च 2क्15 र्पयत तेराव्या वित्त आयोगाच्या अटी व शर्तीनुसार घालून दिलेल्या कामांवर विहीत मर्यादेनुसारच तो खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आह़े
 
इतर जिल्ह्यांना पुढीलप्रमाणो 
ही ग्रँट मंजूर झाले आह़े
नाशिक14 कोटी 31 लाख 5क् हजार 
धुळे सात  कोटी 91 लाख
नंदुरबार   नऊ कोटी पाच लाख 4क् हजार
जळगाव11 कोटी 25 लाख 4क् हजार
अहमदनगर13 कोटी 91 लाख 7क् हजार
पुणो13 कोटी पाच लाख 8क् हजार
सातारानऊ कोटी 82 लाख
सांगलीआठ कोटी 87 लाख 4क् हजार
सोलापूर11 कोटी 89 लाख 1क् हजार
कोल्हापूरनऊ कोटी 82 लाख
औरंगाबादआठ कोटी 55 लाख 9क् हजार
जालनासात कोटी 55 लाख 2क् हजार
परभणीसहा कोटी 37 लाख 3क् हजार
हिंगोलीपाच कोटी 87 लाख 81 हजार
बीडनऊ कोटी 15 लाख 1क् हजार
नांदेड1क् कोटी 74 लाख 1क् हजार
उस्मानाबादसात कोटी 38 लाख 7क् हजार
लातूरआठ कोटी 59 लाख 4क् हजार
बुलडाणानऊ कोटी 43 लाख 1क् हजार
अकोलासहा कोटी 9क् हजार
वाशीमपाच कोटी 99 लाख
अमरावतीनऊ कोटी 56 लाख
यवतमाळ1क् कोटी 54 लाख 1क् हजार
वर्धापाच कोटी 78 लाख 11 हजार
नागपूरसात कोटी 98 लाख 9क् हजार
भंडारापाच कोटी 61 लाख 91 हजार
गोंदियासहा कोटी 2क् लाख 3क् हजार
चंद्रपूरआठ कोटी 12 लाख 41 हजार
गडचिरोलीआठ कोटी 87 लाख 8क् हजार
 

 

Web Title: Strengthening Panchayat Raj Through Center's 287 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.