आरपीआयचा कसारा बंद
By Admin | Updated: November 8, 2014 22:54 IST2014-11-08T22:54:20+5:302014-11-08T22:54:20+5:30
जवखेडा येथे दलित कुटुंबीयांतील तीन जणांची अमानुषपणो हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कसारा बंद व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

आरपीआयचा कसारा बंद
कसारा : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे दलित कुटुंबीयांतील तीन जणांची अमानुषपणो हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कसारा बंद व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने कसा:यात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. तसेच पंचशीलनगर ते कसारा बाजारपेठमार्गे कसारा पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढण्यात आला होता. आरपीआयने पुकारलेल्या या बंदला 1क्क् टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ, टॅक्सी सेवा, खाजगी वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नाशिक -कसारा, कसारा-नाशिक एसटी सेवा सुरळीत सुरू होत्या. मात्र, गजबजलेल्या कसारा रेल्वे स्टेशन परिसरात दिवसभर पूर्णत: सामसूम होती़ बाजारपेठेत शुकशुकाट होता. या बंदमुळे प्रवाशांची व नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. (वार्ताहर)