१९ आॅगस्टला काँग्रेसचे रास्ता रोको
By Admin | Updated: August 17, 2016 03:11 IST2016-08-17T03:11:59+5:302016-08-17T03:11:59+5:30
गेल्या काही वर्षांत कित्येक प्रवाशांचे अपघातात बळी घेणाऱ्या मुंबई - गोवा, महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत तसेच येत्या दीड वर्षात या महामार्गाचे

१९ आॅगस्टला काँग्रेसचे रास्ता रोको
महाड : गेल्या काही वर्षांत कित्येक प्रवाशांचे अपघातात बळी घेणाऱ्या मुंबई - गोवा, महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत तसेच येत्या दीड वर्षात या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे या प्रमुख मागणीसाठी महाडमध्ये काँग्रेस पक्षातर्फे १९ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला. या महामाार्गच्या रुंदीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. त्या शेतकऱ्यांची शासन दिशाभूल करीत असल्याचा आरोपदेखील जगताप यांनी केली.
महामार्गावर कोसळलेल्या सावित्री पुलाशेजारीच त्याला समांतर असलेल्या पूल हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी होते. सावित्री पूल दुर्घटनेला शासनच जबाबदार असल्याचा आरोपही जगताप यांनी केला. अद्यापही महामार्गाच्या चौपदरीकराच्या भुसंपादनाबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. शहर भागात रेडीरेकनरच्या दुप्पट तर ग्रामिण भागात चौपट भरपाई देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ४० लाख रु. हेक्टरी भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा केली. नुकसान भरपाईची हि पध्दत फसवी असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. या रास्तारोको आंदोलनात हे प्रकल्पग्रस्त शेतकरी देखील सहभागी होणार असून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)