पळस्पे येथील महिलांचा तहसील कार्यालयात ठिय्या
By वैभव गायकर | Updated: June 26, 2023 13:23 IST2023-06-26T13:23:07+5:302023-06-26T13:23:28+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषणकर्त्यांना मागण्यांबाबत आश्वासन दिले जाईल असे तहसीलदारांच्या वतीने सांगण्यात आले.

पळस्पे येथील महिलांचा तहसील कार्यालयात ठिय्या
पनवेल : मागील आठ दिवसांपासून गावठाण विस्तार तसेच नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या पळस्पे ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल शासकीय यंत्रणा घेत नसल्याने आज (दि. 26) पळस्पे येथील महिलांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला.
जेष्ठ नेते जी आर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी तहसीलदारानी पोलिसांना पाचारण केले.पोलिसांच्या मध्यस्तीने महिला शांत झाल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषणकर्त्यांना मागण्यांबाबत आश्वासन दिले जाईल असे तहसीलदारांच्या वतीने सांगण्यात आले.