राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
By Admin | Updated: April 27, 2017 00:13 IST2017-04-27T00:13:20+5:302017-04-27T00:13:20+5:30
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल यांनी पनवेल तालुक्यातील डोंगरीचा पाडा तसेच कर्जत परिसरात केलेल्या कारवाईत

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
पनवेल : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल यांनी पनवेल तालुक्यातील डोंगरीचा पाडा तसेच कर्जत परिसरात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह इतर रसायने हस्तगत केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने सध्या दारूबंदीची मोहीम अधिक तीव्र करत तालुक्यासह इतर विभागात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
तालुक्यातील डोंगरीचा पाडा येथे टाकलेल्या छाप्यात ९४ लीटर गावठी दारू व इतर साहित्य असा मिळून जवळपास ६ हजार रु पयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तसेच, कर्जत परिसरात टाकलेल्या छाप्यात ४५ लीटर गावठी दारू, १३०० लीटर रसायने व इतर साहित्य असा मिळून जवळपास ३२ हजार रु पयांचा ऐवज हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)