शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 7:36 AM

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात शनिवारी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून, महापालिकेचे वाशी आणि ऐरोली येथील रुग्णालय, नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय, तसेच बेलापूरमधील अपोलो रुग्णालय या चार लसीकरण केंद्रांवर प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाले. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० जणांना लस दिली जाणार असून, येत्या काही दिवसांत केंद्रांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने ५० लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.कोविड १९ लसीकरणाला देशात प्रारंभ होत असून ही दिलासादायक गोष्ट आहे. १० महिन्यांपेक्षा अधिक काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या कोविड योद्ध्यांनी जो संघर्ष केला, तसेच लस शोधण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी अखंड परिश्रम करून योगदान दिले त्या सर्वांचे आपण आभारी आहोत, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले. लसीकरण सुरू झाले म्हणजे कोरोना संपला, असा अतिआत्मविश्वास न बाळगता कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशी स्थिती येईल तोपर्यंत मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे या कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त बांगर यांनी बेलापूर येथील अपोलो आणि नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील केंद्राला भेट दिली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली केंद्र येथे डॉ. वर्षा राठोड, सार्वजनिक रुग्णालय, वाशी केंद्र येथे डॉ. विजय येवले, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ केंद्र येथे डॉ. आनंद सुडे, आणि अपोलो हॉस्पिटल, बेलापूर केंद्र येथे वेंकटराम व्ही. या कोविड योद्ध्यांना पहिली लस देण्यात आली. नेरूळ येथील केंद्रावर आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. धनवंती घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, आदी उपस्थित होते.  केंद्र व राज्य सरकारच्या कोविड वॅक्सिन मार्गदर्शक सुचना पाळण्यात आल्या.

मोबाइलवर येणार संदेश कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा मोबाइलवर संदेश प्राप्त होणार आहे. संदेश आल्यानंतर त्या दिवशी दिलेल्या केंद्रावर लसीकरणाला जाताना सोबत आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत याची नोंद घेण्यात यावी. लसीचा पुढील डोस कधी घ्यावयाचा याचादेखील संदेश मोबाईलवरूनच प्राप्त होणार आहे.

ही लस इतर लसींसारखीच आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याचे साईड इफेक्ट वगैरे काही होतील का, याची काळजी करण्याची गरज नाही. मी स्वतः लस घेतली असून मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. ही लस फार सुरक्षित असल्यामुळे सर्वांनी घ्यायला हवी- डॉ. आनंद सुडे

अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली लस उपलब्ध झालेली असून आधी आरोग्यसेवकांना मिळत असली तरी सामान्य नागरिकांसाठीही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.- डॉ. स्नेहल मल्लकमीर

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस