तमाशा महोत्सवाला दिमाखात सुरुवात

By Admin | Updated: February 20, 2016 02:07 IST2016-02-20T02:07:50+5:302016-02-20T02:07:50+5:30

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्स

Start of the Tamasha Festival | तमाशा महोत्सवाला दिमाखात सुरुवात

तमाशा महोत्सवाला दिमाखात सुरुवात

नवी मुंबई : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सव २०१६ चे शुभारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. २१ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या तमाशा महोत्सवात शुभारंभाचे सादरीकरण करणाऱ्या ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, बारामती यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवाच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, उत्कृष्ट ढोलकीपटू व सोंगड्या म्हणून लोकप्रिय असलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगारामबुवा कवठेकर यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार, गतवर्षीचे पुरस्कारप्राप्त कलावंत भीमराव तोताराम गोपाळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात सादर होणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित तमाशा मंडळांच्या सादरीकरणाचा कला रसास्वाद तमाशा रसिकांनी
मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक
कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह
आणि संचालक अजय अंबेकर यांच्या वतीने करण्यात
येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Start of the Tamasha Festival