बेलापूरमध्ये मान्सून मेळाव्याला सुरुवात
By Admin | Updated: June 14, 2016 01:31 IST2016-06-14T01:31:28+5:302016-06-14T01:31:28+5:30
सीबीडी-बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये मान्सून मेळाव्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध विभागांतील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि

बेलापूरमध्ये मान्सून मेळाव्याला सुरुवात
नवी मुंबई : सीबीडी-बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये मान्सून मेळाव्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध विभागांतील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन या मेळाव्यांतर्गत करण्यात आले आहे. मान्सूनमध्येही अर्बन हाटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले असून, यंदा १२ महिने विविध प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा विविध भागांतील कारागिरांनी तयार केलेल्या हातमागाच्या वस्तू तसेच हस्तकलेचे प्रदर्शन पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. २६ जूनपर्यंत या मान्सून मेळाव्याला भेट देता येणार असून पटचित्र, राजस्थानी, मधुबनी, वारली चित्रकलेचे प्रदर्शनही याठिकाणी पाहण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. खवय्यांसाठीही या ठिकाणी मेजवानीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मालवणी, कोकणी पध्दतीचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहे.