पालिकेच्या स्थायी समिती सभापतींचे पद धोक्यात
By Admin | Updated: December 13, 2014 01:32 IST2014-12-13T01:32:58+5:302014-12-13T01:32:58+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांना जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणो दाखवा नोटीस सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली आहे.

पालिकेच्या स्थायी समिती सभापतींचे पद धोक्यात
नवी मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांना जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणो दाखवा नोटीस सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली आहे. याविषयी लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व सलग दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविलेले सुरेश कुलकर्णी तुर्भे स्टोअर प्रभाग 42 मधून निवडून आले आहेत. त्यांनी सादर केलेले वडार जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष जाधव यांनी 2क्1क् मध्ये उच्च न्यायालयात केली होती. जून 2क्14 मध्ये न्यायालयाने त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्याची छाननी करण्यासाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक 1 सोलापूर यांच्याकडे पाठविले होते. याविषयी संबंधित विभागाकडे चौकशी सुरू होती.
दक्षता पथकाने सर्व कागदपत्रंची छाननी केली. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या तुर्भे येथील शाळेच्या दाखल्याची पडताळणी केली असता 1973 ते 79 दरम्यान कोणताही अभिलेख शाळेतून उपलब्ध झालेला नाही. यामुळे सदर दाखला खरा असल्याचा पुरावा दिसत नाही. कुलकर्णी यांच्या वडिलांच्या सोलापूर पालिका शाळेतील दाखल्याची छाननी केली असता तो पुरावा बनावट व खोटा असल्याचे समितीचे मत झाले आहे.
जातप्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी कुलकर्णी यांनी 12 जणांचे शालेय पुरावे , खरेदी खत, गहाण खत व इतर कागदपत्रे सादर केली आहेत. परंतु संबंधितांशी असलेल्या नातेसंबंधाविषयी कागदोपत्री पुरावा समितीसमोर सिद्ध करावा असे मत व्यक्त केले आहे. सन 1961 पूर्वीचे वडार जातीचे सबळ व ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. यामुळे 12 डिसेंबरला समितीने कारणो दाखवा नोटीस बजावली आहे. जातीच्या वैधतेबाबत पुरावे सादर करण्याची जबाबदारी संबंधितांची असल्यामुळे तुमचे वडार जातीचे प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये याविषयी लेखी खुलासा करण्यात यावा असे मत व्यक्त केले आहे. याविषयी पुढील सुनावणी 16 जानेवारी 2क्15 ला होणार आहे. या सुनावणीस उपस्थित न राहिल्यास उपलब्ध कागदपत्रंवरून अंतिम निर्णय देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
कुलकर्णी नॉट रिचेबल
च्जाती प्रमाणपत्र समितीने नोटीस व दक्षता पथकाचा चौकशी अहवाल सुरेश कलकर्णी यांच्या पत्त्यावर पाठविला आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.
च्जातप्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी कुलकर्णी यांनी 12 जणांचे शालेय पुरावे , खरेदी खत, गहाण खत व इतर कागदपत्रे सादर केली आहेत.