एसटीखाली महिला चिरडली
By Admin | Updated: May 31, 2016 03:15 IST2016-05-31T03:15:10+5:302016-05-31T03:15:10+5:30
दोन दिवसांपूर्वी लोधीवलीजवळील एसटीच्या अपघाताची घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडत असताना एसटीच्या मागील चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

एसटीखाली महिला चिरडली
वावोशी : दोन दिवसांपूर्वी लोधीवलीजवळील एसटीच्या अपघाताची घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडत असताना एसटीच्या मागील चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खालापूर हद्दीत चौक गावामध्ये घडली.
एसटीचालक विठ्ठल मारुती श्यामे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या ताब्यातील एसटी (एमएच २० बीएन १६७२) ही पनवेल ते कर्जत असे घेऊन जात होते. रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई -पुणे महामार्गावर चौक बस स्टॉपवर एसटी थांबली होती. प्रवासी घेतल्यानंतर एसटी कर्जतकडे जाण्यास निघाली असताना रस्ता ओलांडत असणारी कमल कुंभार (६०, रा. तुपगाव, चौक) एसटीच्या मागील चाकाखाली येऊन अपघात झाला. या अपघातात कमल कुंभार यांच्या पायावरून एसटीचे चाक गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रु ग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. परंतु प्राथमिक उपचारानंतर कमल कुंभार यांना पनवेल येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान कमल कुंभार यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहा. पोलीस उप निरीक्षक खरे करीत आहेत. (वार्ताहर)दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सल्फर नेणाऱ्या आयचर टेम्पोला केंबुर्ली गावच्या हद्दीत रुची हॉटेलसमोर अपघात झाला. मात्र या गाडीमधील काही सल्फर महामार्गावर सांडल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या अनेक वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात जवळपास पाच तास त्रास सहन करावा लागला.
जयगड पोर्टवरून रोहा या ठिकाणी एका कारखान्याचा पिवळा सल्फर भरून जाणारा आयचर टेम्पो क्र. एम. एच. ०६ बीडी २४१ याला केंबुर्ली गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये टेम्पोच्या बॉडीचा भाग तुटला व गाडीमधील काही प्रमाणात सल्फर राष्ट्रीय महामार्गावर सांडत गेले. या अपघातानंतर
रस्त्यावरु न जाणाऱ्या प्रवाशांना, या सल्फरचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला.
डोके जड होणे, मळमळ होणे, डोळ्यात आग होणे असे अनेक त्रास सुरू झाले. काही काळानंतर महाड बिट मार्शलचे पो. कॉ. प्रशांत ठाकूर, पो. कॉ. राहुल मोहिते या ठिकाणी पोहोचले. मात्र अपघातानंतर टेम्पो चालक या ठिकाणाहून पसार झाला होता. पोलिसांनी वाहन मालक दिनेश भोसले (रा. रोहा) यांना बोलावून घेतले. गाडी ताब्यात घेत सर्व परिसरातील रसत्यावरील साफसफाई के ली. यासाठी पाच तास लागले.