क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचा फार्स
By Admin | Updated: December 12, 2015 01:42 IST2015-12-12T01:42:45+5:302015-12-12T01:42:45+5:30
रायगड जिल्हा क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आठ कोटीच्या निधीपैकी तब्बल पाच कोटी रुपये खर्चून अलिबागजवळच्या नेहुली या गावी बांधण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे

क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचा फार्स
जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्हा क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आठ कोटीच्या निधीपैकी तब्बल पाच कोटी रुपये खर्चून अलिबागजवळच्या नेहुली या गावी बांधण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे गेल्या ७ जून २०१५ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांकरिता आवश्यक असणाऱ्या सुविधाच उपलब्ध नसल्याने, रायगड जिल्हा क्रीडा परिषदेच्या जिल्हा क्र ीडा सप्ताहाचे आयोजन येथे करता येत नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला या क्रीडा संकुलाचा उद्घाटन समारंभ हा एक केवळ फार्स होता हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकाराबाबत जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्हा क्रीडा संकुलातील असुविधांमुळे यंदाच्या जिल्हा क्र ीडा परिषदेच्या क्र ीडा सप्ताहाचे आयोजन १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध शाळांच्या मैदानावर करण्यात आले आहे.
क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी १२ डिसेंबरला नागोठणे येथील जे. एच. अंबानी स्कूलच्या मैदानावर करण्यात येणार आहे. येथे स्थानिक खेळाडूंचे संचलन, लगोरी व तलवारबाजी या क्र ीडा स्पर्धा होणार आहेत. रविवार १३ डिसेंबरला कराटे स्पर्धांचे आयोजन अलिबाग तालुक्यांतील आवास येथील बा.ना.हायस्कूलच्या मैदानावर केले आहे. सोमवार १४ डिसेंबरला भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार व खेळांचे प्रदर्शनाचे अलिबाग तालुक्यांतील नागांव हायस्कूलच्या मैदानावर आयोजन केले आहे. गुरुवारी १७ डिसेंबरपर्यंत स्पर्धा होणार असून क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभ शुक्रवारी १८ डिसेंबरला रायगड जिल्हा क्र ीडा संकुलातील सभागृहात होणार आहे.