स्पोर्टस क्लब प्रकरणी केडीएमसीची कारवाईस टाळाटाळ?
By Admin | Updated: November 13, 2014 23:09 IST2014-11-13T23:09:07+5:302014-11-13T23:09:07+5:30
महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडला नसल्याने या प्रकरणात जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा पालिका वतरुळात सुरू आहे.

स्पोर्टस क्लब प्रकरणी केडीएमसीची कारवाईस टाळाटाळ?
कल्याण : कल्याण स्पोर्ट्स क्लब प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात कंत्रटदाराने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्याच्या घटनेस 15 दिवसांचा कालावधी उलटला तरी यासंदर्भातील पुढील कारवाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडला नसल्याने या प्रकरणात जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा पालिका वतरुळात सुरू आहे.
कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या कंत्रटदाराने अटी-शर्तीचा भंग केल्यामुळे ऑक्टोबर 2क्11 मध्ये केडीएमसी प्रशासनाने तेथील मॅरेज सभागृहाला सील ठोकले होते. याविरोधात कंत्रटदाराने कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. कराराप्रमाणो 25 हजार 88क् चौमी जागा ताब्यात मिळणो, बांधकामाला ना-हरकत दाखला मिळणो, कराराची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कोर्ट कमिशनरची नेमणूक करणो, नुकसानभरपाई म्हणून 1क् कोटी रुपये मिळावेत, महापालिकेने बांधकामात हस्तक्षेप करू नये, आदी मुद्यांकडे त्याने लक्ष वेधले होते.
यावर हा दावा पूर्णपणो अटी-शर्तीव्यतिरिक्त दाखल केला आहे. कंत्रटदाराने कोणतीही परवानगी न घेता मनोरंजन केंद्राचा वापर सुरू करणो, नोटीस बजावूनही त्याचे पालन न करणो, करारनाम्यात ठरल्याप्रमाणो 32 हजार 319 चौमी जागेचा ताबा देण्यात आला आहे. याचबरोबर प्रीमिअमची 3 कोटी 5क् लाखांची रक्कम कंत्रटदाराने भरलेली नसल्याचे स्पष्टीकरण केडीएमसीने न्यायालयात सादर केले होते. यावर 3क् ऑक्टोबर 2क्14 ला अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने कंत्रटदाराची याचिका फेटाळली होती़ यात महापालिकेची सभागृहाला सील ठोकण्याची कारवाई उचित होती, हे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित कंत्रटदाराने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली असताना केडीएमसीने ठोस कारवाई करून कल्याण स्पोर्ट्स क्लब आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगात
करणो आवश्यक होत़े परंतु, अद्याप याला मुहूर्त सापडला नाही.
(प्रतिनिधी)