वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
By Admin | Updated: June 12, 2016 00:52 IST2016-06-12T00:52:51+5:302016-06-12T00:52:51+5:30
पावसाळ््यादरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसावा तसेच वाहने सुस्थितीत असावीत, याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
नवी मुंबई : पावसाळ््यादरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसावा तसेच वाहने सुस्थितीत असावीत, याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३ हजार ९५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, ४ लाख १३ हजार ६३२ रुपये शुल्क वसूल करण्यात आले.
१७ मे रोजी सुरू झालेली ही मोहीम नुकतीच पार पडली असून, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत वाहनांना व्हायपर नसणे, सदोष टायर्स, आरसे नसणे, हेडलाइट नसणे, इंडिकेटर नसणे, मडगार्ड नसणे आदी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.