शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘एसपी सिंगला’चे करंजा पुलाचे कंत्राटही वादात, धरमतर खाडीत २.४ किमीचा पूल

By नारायण जाधव | Updated: June 27, 2023 12:30 IST

Navi Mumbai: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पुलाचे कंत्राट  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले आहे. ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या चौकशीची मागणी होत आहे. त्यात या पुलाच्या कंत्राटाचाही समावेश आहे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला गोरेगाव - मुलुंड उन्नत मार्ग या ६ पदरी उड्डाणपुलाचे ६ अब्ज ६६ कोटी ६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे कंत्राट दिले आहे. संबंधित कंत्राट मागे घेण्याची मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल यांच्याकडे केली होती. त्यावर हे काम सुरूच राहील, असे आयुक्तांनी सांगितले होते.

१०० कोटी कमी दराने घेतले काम  २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे कंत्राट दिले आहे.   त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस.पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे.   या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून, त्यापेक्षा एस.पी. सिंगलाने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

हे सहा स्पर्धक होते कंत्राटदार  एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ काेटी  लार्सन ॲण्ड टुब्रो ८७३.१० काेटी  जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० काेटी  रेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० काेटी  ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० काेटी  अशोका बिल्डकॉन १२८९.७० काेटी

 बिहारमध्ये गुन्हा दाखल   गंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळल्याने त्याच्या बांधकाम दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत.   या दुर्घटनेनंतर बिहार सरकारने एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.    यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी किंवा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई