ठाण्यात लवकरच नाटय़ जल्लोष महोत्सव
By Admin | Updated: October 28, 2014 23:00 IST2014-10-28T23:00:52+5:302014-10-28T23:00:52+5:30
ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून राहणारे व योग्य संधी न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहणारे कलाकर शोधून त्यांना भविष्यात रंगकर्मी म्हणून कारकीर्द मिळवून देण्याची संधी मिळावी

ठाण्यात लवकरच नाटय़ जल्लोष महोत्सव
ठाणो : ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून राहणारे व योग्य संधी न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहणारे कलाकर शोधून त्यांना भविष्यात रंगकर्मी म्हणून कारकीर्द मिळवून देण्याची संधी मिळावी यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक र}ाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली पहिला वाहिला नाटय़जल्लोष महोत्सव हळूहळू ठाण्यात आकारास येऊ लागला आहे.
कला, क्रीडा, साहित्य, कलाकारी, अदाकारी व या सा:याच्या अभिव्यक्तीमधून वंचित समूहातील युवा पिढीला व्यासपिठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या येत्या जयंतीदिनी जानेवारी महिन्यात या नाटय़ महोत्सवाचे आयोजन होणार आहे. त्याच्या तयारीने आता वेग पकडला आहे, अशी माहिती र}ाकर मतकरींनी ठाण्यात नुकत्याच आयोजित दुस:या बैठकीत दिली. यावेळी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालिया होते.
ठाण्यात खारटन रोड, नागसेन नगर, राबोडी, माजिवाडा, मानपाडा, ढोकाळी, मनोरमा नगर, सावरकर नगर, येवून , लोकामान्य नगर, वागळे इस्टेट, यशोधन नगर आदी भागातून नाटय़ जल्लोषमध्ये सामील होण्यासाठी युवकांची बांधणी सुरु झाली असून सुमारे 15 नाटय़ गटांची गटबांधणी आकारास येऊ लागली असल्याची माहिती संस्थेच्या कार्यवाहक व गटबांधणी समिती संयोजक लतिका सु. मो. यांनी दिली.
या महोत्सवाचा भाग म्हणून 2क् नोव्हेंबर र्पयत सर्व गट बांधणी पूर्ण करण्याचा मनोदय या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सुमारे महिनाभर या गटांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील भेडसावणा:या विविध प्रश्नांवर, आपआपल्या क्षमतेनुसार 15 ते 2क् मिनिटांचे नाटय़ रुप उभे करायचे आहे. या नाटय़रुपाची लेखन, भाषा, नेपथ्य, संगीत आदींबाबत कोणतेही नियम वा बंधने नसतील, असे मतकरी यांनी स्पष्ट केले. उलट स्वत:चे विचार स्वत:च्या पध्दतीने त्यांनी सादर करणो हेच अभिप्रेत आहे, असे त्यांनी सांगितले.
नाटय़ - चित्रपट सिरियल्स क्षेत्रत दैदीप्यमान कामगिरी असणारे काही प्रतिथयश कलाकार या गटांना
स्वमत - स्वभाव - स्व जाणिवा प्रभावीपणो अभिव्यक्त करण्यास मदतनीस म्हणून काम करणार
आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी सुहास
जोशी, उदय सबनीस, सुप्रिया
विनोद, विजू माने, अरुंधती भालेराव यांनी याकामी संपूर्ण सहका:याचे आश्वासन दिले असून हर्षदा बोरकर, मीनल उत्तूरकर, कल्पना भांडारकर, संजय निवंगुणो, हर्षलता कदम, शोभाताई वैराळ इत्यादी कार्यकर्ते गटबांधणीच्या कामात जोमाने कार्यरत आहेत.
या महोत्सवासाठीचा निधी दुहेरी पध्दतीने उभारण्याची योजना बालनाटय़ाच्या प्रतिभा मतकरी व समता विचार प्रसारक संस्थेचे डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सांगितले. एकीकडे विविध संवेदनशील आस्थापनातील अधिकारी व उद्योजकांच्या माध्यमातून प्रायोजकत्व मिळवून व स्मरणिका प्रकाशित करुन निधी संकलन होणार असून दुसरीकडे सर्व सामान्य जनता व गरीब वस्त्यांमधूनही शक्य तेवढा निधी उभारला जाणार आहे. या महोत्सवाच्या गट बांधणी समिती सोबतच प्रत्यक्ष महोत्सव आयोजनाकामी जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे, वी नीड यू सोसायटीचे जयंत कुलकर्णी, जागचे मिलिंद गायकवाड, रंगकर्मी मकरंद तोरसकर प्रभूतींची ‘नाटय़ जल्लोष व्यवस्थापन समिती’ गठित करण्यात आह़े