मुलगा वडिलांची जागा घेऊ शकत नाही

By Admin | Updated: November 4, 2015 01:26 IST2015-11-04T01:26:26+5:302015-11-04T01:26:26+5:30

विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जात असलेले विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मंगळवारी महेंद्रसिंह धोनी आणि

A son can not take the place of a father | मुलगा वडिलांची जागा घेऊ शकत नाही

मुलगा वडिलांची जागा घेऊ शकत नाही

जयपूर : विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जात असलेले विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मंगळवारी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची तुलना करताना
मुलगा आताच वडिलांची बरोबरी करू शकत नाही, असे वक्तव्य
केले.
एका क्रिकेट महोत्सवाच्या उद््घाटनानिमित्त येथे आलेल्या कपिल देव यांनी पत्रकार
परिषदेत सचिनबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले;
पण धोनी व विराट यांच्या कर्णधारपदाच्या तुलनेबाबत
विचारले असता, त्यांनी कुणाचे नाव न घेता ‘मुलगा आताच वडिलांची बरोबरी करू शकत नसल्याचे
सूचक वक्तव्य केले. वडील
सध्या वडीलच असून, मुलगा एक दिवस वडील होईल,’ अशी मला आशा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
माजी कर्णधार कपिल देव यांनी या प्रकरणात थेट उत्तर देण्याचे टाळताना अप्रत्यक्षपणे बरेच काही सूचित केले. कपिल देव म्हणाले, ‘विराटच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.’
कपिल पुढे म्हणाले, ‘प्रतिस्पर्धी संघाने ४०० पेक्षा अधिक धावा फटकावल्यानंतर शास्त्रीप्रमाणे मलाही त्रास झाला होता.
भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघासाठी अनुकूल
खेळपट्टी मिळायला पाहिजे होती.’(वृत्तसंस्था)


मला जे सचिनबद्दल वाटले ते मी सांगितले. तुम्हाला यात जे योग्य वाटते, ते तुम्ही समजून घ्यावे. या व्यतिरिक्त या विषयावर मला काही बोलायचे नाही. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी एकदा म्हटले होते की, खेळ हा लोकांना जोडण्याचे कार्य करतो. त्यामुळे खेळाची धर्मासोबत सांगड घालणे चुकीचे आहे. - कपिलदेव

Web Title: A son can not take the place of a father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.