शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कुणी लसूण सोलताेय, तर कुणी कांदा चिरतोय; मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 07:59 IST

आता डोळ्यांत पाणी आलं तरी आरक्षण मिळेल तेव्हा तेच आनंदाश्रू ठरतील

- नारायण जाधवनवी मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ पुण्याची वेस  ओलांडून राजधानी मुंबईकडे कूच करतेय. मराठा आरक्षण मोर्चात लाखाे मराठा बांधवांसह लेकुरवाळ्या माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वयोवृद्धांनी आरक्षणासाठी वयोमानाचा थकवा विसरून मुंबईकडे धाव घेतली आहे. या सर्वांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. 

खोपोली, पनवेल, कळंबोली, खारघर, नेरूळ, एपीएमसी मार्केट या भागात मराठा बांधवांनी आंदोलकांच्या जेवणाची जय्यत तयारी सुरू केली होती. यासाठी सकाळपासून मोर्चाच्या मार्गातील अनेक ठिकाणी जेवण तयार करण्यासाठी मराठा पुरुष बांधवांमध्ये कोणी लसूण सोलताना दिसतोय, कुणी कोथिंबीर, भाज्या निवडतोय, तर कोणी कांदा चिरताना दिसत हाेते. 

प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, ‘आण रं ती कांद्याची गोणी. त्या सुऱ्यापण घे, या भावड्यांना दे कांदा चिरायला. आरक्षणाच्या मागणीसाठी आपला वाघ येतोय मुंबईला, असे सांगून ते पुन्हा लसूण सोलू लागले, कांदा चिरू लागले.’

आता ही आरपारची लढाई आहे... 

कांदा चिरण्याची सवय नसल्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. यावर त्यांचे म्हणणे होते, होय येथे पाहा कुणी लसूण सोलताेय तर कोणी डाळ-तांदूळ साफ करतोय. माझ्यासारख्या इतरांच्या डोळ्यांत कांदा चिरल्याने पाणी आलंय, हे खरं आहे; पण आमची लढाई हक्कांसाठी सुरू आहे. नव्या पिढीला आरक्षणाचे लाभ मिळावेत, यासाठी ती सुरू आहे. आता ही आरपारची लढाई आहे. यामुळे आता डोळ्यांत पाणी आलं तरी चालेल. कारण आरक्षण मिळाल्यास तेच आनंदाश्रू ठरतील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबई