शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 02:47 IST

महापालिका आणि सिडको दरम्यान घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेला वाद शहरवासीयांच्या मुळावर बेतला आहे.

- वैभव गायकर पनवेल : महापालिका आणि सिडको दरम्यान घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेला वाद शहरवासीयांच्या मुळावर बेतला आहे. महापालिका क्षेत्रात सिडकोच्या अखत्यारीत असलेला ७0 टक्के भाग येतो. या भागात सिडकोच्या माध्यमातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. परंतु विविध कारणांमुळे या कामात अनियमितता आली आहे. याचा परिणाम म्हणून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळोजा एमआयडीसीत चाल परिसरात सुमारे ३५ एकरच्या क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे. २00७ सालापासून हे डंपिग ग्राउंड कार्यान्वित आहे. डंपिंग ग्राउंडच्या स्थापनेपासून येथील स्थानिक ग्रामस्थांनी या डंपिंगला विरोध दर्शविला आहे. यामध्ये घोट गाव, करवले, भोईरवाड, कोयनावेले, नितळस या गावांसह ठाणे जिल्ह्यातील उसाटणे, बुर्दूल या गावांचा देखील विरोध आहे. सततच्या दुर्गंधीयुक्त वास तसेच आरोग्यावरील घातक परिणाम यांच्यामुळे ग्रामस्थांनी हा विरोध दर्शविला आहे.या डंपिंगला सर्वपक्षीय विरोध असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री वामनबाबा संघर्ष समितीमार्फत लढा उभारला आहे. याव्यतिरिक्त डंपिंग ग्राउंडमध्ये प्रक्रि या झालेले दूषित पाणी येथील शेतजमिनीत जात असल्याने देखील येथील शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषद व २३ ग्रामपंचायतींचा परिसर वगळून खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या सिडको नोडमधील कचरा सिडकोमार्फत उचलला जातो. पनवेल महानगर पालिका क्षेत्रातून दररोज ४५५ ते ४६0 टन कचरा दररोज गोळा केला जातो. यामध्ये सुमारे ३८0 टन हा कचरा सिडको नोडमधील आहे.शहरातील १00 पेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयाचे वर्गीकरण करणेसंदर्भात महापालिकेने सूचना केल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात कचरा व्यवस्थापनाची सेवा हस्तांतरण करणार आहे. त्यानंतर पालिका सिडको डम्पिंग ग्राउंडवर कचºयाची विल्हेवाट लावेल. प्रक्रि या करण्याचे काम सिडकोच करेल. त्याचा सिडकोला मोबदला दिला जाईल. डम्पिंग ग्राउंडची क्षमता दोन वर्षांत संपणार आहे. त्यामुळे सिडकोने भूखंड द्यावा, अशा आशयाचा करार केला जाणार असल्याची माहिती पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.>सिडको कार्यक्षेत्रात समस्या गंभीरखारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेलमध्ये सिडको नियुक्त कंत्राटदारांच्या माध्यमातून दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावली जाते, परंतु विविध कारणांमुळे हे काम योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळतात.घनकचरा व्यवस्थापन पालिकेकडे हस्तांतरण झाल्यावरच कचºयाचा हा प्रश्न निकाली निघेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.