पाणी प्रश्न तातडीने सोडवा
By Admin | Updated: February 6, 2015 23:16 IST2015-02-06T23:16:23+5:302015-02-06T23:16:23+5:30
पाणीटंचाईसंदर्भात बोईसरचे आ. विलास तरे यांनी ड प्रभाग समिती कार्यालयाला भेट

पाणी प्रश्न तातडीने सोडवा
वसई : बोईसर विधानसभा अंतर्गत मनपा क्षेत्रातील परिसराला जाणवणाऱ्या पाणीटंचाईसंदर्भात बोईसरचे आ. विलास तरे यांनी ड प्रभाग समिती कार्यालयाला भेट देऊन प्रभाग समिती सभापती समवेत चर्चा केली व पाण्याचा प्रश्न त्वरेने सोडवण्यात यावा, असे निर्देश दिले. यावेळी पाणीपुरवठ्याचे अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.
उन्हाळा सुरू झाला की वसई विरार पूर्वेस अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागते. हे लक्षात घेऊन बोईसरचे आ. विलास तरे यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ड प्रभाग समितीचे सभापती रमेश घोरकाना यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर ज्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे तेथे पाण्याच्या टाक्या ठेवून तसेच पेल्हार व सूर्याच्या जलवाहिनीवर वॉल कनेक्शन देण्याचे आदेश दिले.
पाणीटंचाई संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर आ. तरे यांनी सभापती समवेत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार तरे यांच्यासमवेत विन्सेंट फरगोस, मिलिंद घरत, महेश धनगर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)