तळोजा मध्यवर्ती कारागृहात सौरऊर्जा प्रकल्प

By Admin | Updated: May 30, 2016 02:15 IST2016-05-30T02:15:43+5:302016-05-30T02:15:43+5:30

वीजबचतीसाठी जगभरात विविध कार्यक्रम राबवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे.

Solo Power Project in Taloja Central Jail | तळोजा मध्यवर्ती कारागृहात सौरऊर्जा प्रकल्प

तळोजा मध्यवर्ती कारागृहात सौरऊर्जा प्रकल्प

वैभव गायकर,

पनवेल- वीजबचतीसाठी जगभरात विविध कार्यक्रम राबवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने देखील याकरिता मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले जातात. सोलार सिस्टीमचा वापर करून जास्तीत जास्त वीजबचतीचा प्रयत्न सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. या अंतर्गत सौरऊर्जा हा प्रकल्प राबवून तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार आहे. रायगड जिल्हाधिकारी व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याकरिता आर्थिक सहाय्य केले आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहात अबू सालेमसह अनेक कुविख्यात कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची संख्या १७०० च्या आसपास आहे. तळोजा कारागृह परिसरात सौरऊर्जा प्रकल्पाअंतर्गत एकूण २८० पोल उभारले जाणार आहेत. त्यापैकी ११५ पोल हे कारागृहाच्या आतील भागात लावले जाणार आहेत, तर उर्वरित १६५ पोल कारागृहाबाहेरील परिसरात लावले जाणार आहेत. याकरिता एकूण ४० लाख रु पये खर्च होणार असून त्यापैकी ३० लाख रु पयांचा निधी रायगड जिल्हाधिकारी उपलब्ध करणार असून उर्वरित १० लाख रु पये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे सौरदिवे उभारणीचे काम इंफ्रोंन्स या खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे जेल परिसरात विजेचा ताण कमी पडणार असून सुमारे एक लाखाची वीजबचत होणार आहे. सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे महिन्याचे वीजबिल तीन लाखांच्या आसपास येते. या प्रकल्पामुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणात कपात होणार असल्याची प्रतिक्रि या कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांनी दिली. कारागृहाचे मुख्य अधीक्षक सदानंद गायकवाड, अशोक कारकर, सुवर्णा चोरगे आदींच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.
>महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन (मेढा) प्रकल्पाअंतर्गत विद्युतीकरण कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. याकरिता राज्य शासन २५ लाख रु पये निधी उपलब्ध करून देणार आहे. दिवस-रात्र या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. दोन्ही वेळेला या प्रकल्पांतर्गत दिवे स्वयंप्रकाशित होणार आहेत.

Web Title: Solo Power Project in Taloja Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.