धूमस्टाईल महागात
By Admin | Updated: March 20, 2017 02:21 IST2017-03-20T02:21:00+5:302017-03-20T02:21:00+5:30
सध्या धूमस्टाईलने बाइक चालवणारे तरुण शहरात मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. महागड्या दुचाकीवर स्टंट मारण्याचा

धूमस्टाईल महागात
पनवेल : सध्या धूमस्टाईलने बाइक चालवणारे तरुण शहरात मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. महागड्या दुचाकीवर स्टंट मारण्याचा क्रेझ तरु णाईमध्ये वाढत असून ही क्रेझ तरुणांसाठी जीवघेणी ठरत आहे.
मुंबईहून कर्जतला जाणाऱ्या १० ते १५ बायकर्सच्या घोळक्यामधील एकाची दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गॅरी रोजारियो (३३) असे तरु णाचे नाव आहे. पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर हा अपघात सकाळी झाला. अपघातात गॅरी जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहे. पनवेल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अपघातानंतर महागड्या गाड्या रस्त्यावर रांगेत थांबल्या होत्या. या गाड्या बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)