कळंबोलीत घराचा स्लॅब कोसळला

By Admin | Updated: February 28, 2016 04:08 IST2016-02-28T04:08:02+5:302016-02-28T04:08:02+5:30

कळंबोली येथील सेक्टर-५मधील केएल-२ टाईपमधील एका घरात शुक्रवारी मध्यरात्री छताचा स्लॅब कोसळला. या घटतेत घरातील आई व मुलाग जमखी झाले आहेत.

The slab of the house collapsed in Kalamboli | कळंबोलीत घराचा स्लॅब कोसळला

कळंबोलीत घराचा स्लॅब कोसळला

कळंबोली : कळंबोली येथील सेक्टर-५मधील केएल-२ टाईपमधील एका घरात शुक्रवारी मध्यरात्री छताचा स्लॅब कोसळला. या घटतेत घरातील आई व मुलाग जमखी झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही सिडको पुनर्विकासाकरिता चालढकल करीत असल्याने जीव मुठीत धरून येथे राहावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडको आमचा जीव जाण्याची वाट पाहणार आहे, का असा प्रश्नही मोरे कुटुंबीयांनी केला आहे.
सिडकोकडून अल्प उत्पादन गटातील लोकांना परवडणारी घरे बांधण्यात आली होती. १९८७ साली २४८ सदनिका आणि ३१ इमारतींकरिता गणेश ओनर्स असोसिएशन ही सोसायटी स्थापन करण्यात आली. माथाडी कामगारांची ही घरे मोडकळीस आली आहेत. या ठिकाणी अनेक कुटुंबे जीव मुठीत धरू राहत असून, कित्येक घरांचे छत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर इमारतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. सिडकोने यापैकी ठरावीकच इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्याच्या पुनर्विकासाचे भिजत घोंगडे अध्यापही शासन दरबारी पडून आहे. प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षांपासून धूळ खात असल्याने स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. शुक्र वारी मध्यरात्री इमारती क्र मांक ३० मधील क्र मांक-२च्या खोलीमधील छताचा स्लॅब अचान कोसळला. त्यावेळी या घरात राहणारे संजय मोरे यांचे कुटुंब गाड झोपेत होते. त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा सुयश यांच्या अंगावर हा स्लॅब कोसळला. त्यामध्ये सुयशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सीमा मोरे यांच्या छातीला मार लागला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आत्माराम पाटील आणि इतर रहिवाशांनी त्यांना उपचारार्थ एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यापूर्वी पोपट कृष्णा गोडसे यांच्या घराच्या छताचा स्लॅब खाली पडला. या परिसरातील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून वेळेत याविषयी ठोस पावले न उचलल्यास भविष्यात स्लॅब कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित ठिकाणच्या रहिवाशांनी इमारती खाली करण्याकरिता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र रहिवासी नकार देत आहेत. केएल-२ इमारतीच्या पुनर्विकासाकरिता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
- किरण फणसे,
अधीक्षक अभियंता

Web Title: The slab of the house collapsed in Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.