शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

‘स्काडा’ यंत्रणा बंद तरी लाखोंची बिले अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 03:03 IST

पाणीपुरवठा विभाग : नगरसेवकांनी केली चौकशीची मागणी

नवी मुंबई : पाणीपुरवठा सेवेकरिता उभारण्यात आलेल्या जलदगती माहिती व नियंत्रण यंत्रणा (स्काडा) बंद असताना ठेकेदाराला बिल देण्यात आले आहे. या प्रकरणाची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत केली.

पाणीपुरवठा विभागाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपये खर्च करून स्काडा यंत्रणा सुरू केली होती. मोरबे धरण परिसरातील पावसाची व धरणाच्या पातळीची नोंद ठेवता यावी. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील आठ फिल्टर बेडच्या बॅकवॉश यंत्रणेचे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष येथून परीक्षण करता यावे. मनपा क्षेत्रातील ईएसआर, जीएसआर, एचएसआर येथे येणाऱ्या आणि जाणाºया पाण्याच्या दाबाची व प्रवाहाची नोंद ठेवणे. सेक्टर-२८ मधील बेलापूर पंप हाउस आणि दिघापर्यंतच्या पाण्याच्या प्रवाहाची नोंद घेण्यासह मीटर रीडिंगसाठी ही प्रणाली राबविण्यात येणार होती. बेलापूर ते दिघापर्यंत गुरुत्वाकर्षणाने पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; पण प्रत्यक्षात ही प्रणाली योग्यपद्धतीने सुरूच झाली नाही. यंत्रणा बंद असताना ठेकेदाराला बिले देण्यात आली आहेत. यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात बहुतांश मीटर चोरीला गेले आहेत. याकडेही लक्ष वेधण्यात आले. स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या दौºयात स्काडाच्या सीबीडी येथील केंद्रात काहीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे देवीदास हांडे-पाटील, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, नवीन गवते यांनी स्काडामधील त्रुटी निदर्शनास आणल्या. सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही प्रशासनाला स्काडा प्रणालीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनीही एका महिन्यात चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या, यामुळे स्काडा प्रणाली पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. चौकशी कोण करणार व चौकशीमध्ये काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्काडाच्या यापूर्वीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करताना सदस्यांनी यापुढे ही यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी ४ कोटी २४ लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.यापूर्वीच्या स्काडा प्रणालीची वस्तुस्थितीप्रकार संख्या सुरू बंदअल्ट्रासोनिक फ्लो मीटर १८० ३१ १४९मॅग्नेटिक फ्लो मीटर ५० ५ ४५प्रेशर ट्रान्समीटर १४४ ३५ १०९लेव्हल ट्रान्समीटर ५८ ६ ५२क्लोरीन ट्रान्समीटर ५३ ० ५३पीएच ट्रान्समीटर ४ ० ४अ‍ॅक्च्युएटर १५२ २ १५०नगरसेवकांची दुटप्पी भूमिकाच्स्काडा प्रणालीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दोन आठवडे स्थगित करण्यात आला होता. ही प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचा दावा करण्यात आला होता.च्सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतले व अखेर तो सर्वमताने मंजूर केला आहे, यामुळे नगरसेवकांनी यापूर्वी नक्की कशासाठी विरोध केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थायी समितीमध्ये दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याची टीकाही होऊ लागली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई