शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वायुगळतीचा सहा कामगारांना त्रास, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:37 IST

कामगार प्लॉट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्या वेळी निर्माण झालेल्या अ‍ॅसिटॉन या वायूच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याने प्रकृती खालावली.

धाटाव : धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी प्रदूषणाचे थैमान घातले असतानाच कंपनीअंतर्गतअपघाताची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कोरस इंडिया कंपनीमध्ये सहा कामगारांना वायुगळतीचा त्रास झाल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.कंपनीच्या पाच नंबर प्लॉटमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना सहा कामगारांना वायुगळतीमुळे त्रास झाला. कंत्राटी व कायम अशा सहा कामगारांना वायुबाधा झाली आहे. सर्वांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपन्यांमधून कामगारांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना घेतल्या जात नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, त्यामुळे कामगारांमध्ये घबराट पसरली आहे.धाटाव औद्योगिक वसाहतीमधील दुसऱ्या पाळीतील कामगार प्लॉट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्या वेळी निर्माण झालेल्या अ‍ॅसिटॉन या वायूच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याने प्रकृती खालावली. यामध्ये म्हाबीर टुडू (२४, रा. उत्तरप्रदेश), सुनील शाव (३१, रा. उत्तरप्रदेश), चंद्रकांत ढउल (५६, रा. भवन), प्रवीण साबळे (३२, रा. धाटाव), तुषार काफरे (३०, रा. रोहा) निखिल सुर्वे (३८, रा. रोहा) या कायम व कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. एक कामगार अत्यवस्थ असून, पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर कामगारांच्या प्रकृतीत स्थिर आहे. कंपनीत नेमकी कशामुळे वायुगळती झाली याचा तपास सुरू असल्याची माहिती कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकांनी दिली. कोरस कंपनीवर आता पुन्हा काय कारवाई होणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMIDCएमआयडीसी