शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

स्वच्छतेचा संदेश देत धावले सहा हजार नवी मुंबईकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 00:08 IST

स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे सहा हजार जणांनी सहभाग घेतला होता. या वेळी खुल्या गटात २१ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये पुरुष गटातून विष्णू राठोरे व महिला गटातून साईगीता नायर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याच संकल्पनेतून महापालिका व स्टर्लिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाम बीच मार्गावर नवी मुंबई महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. त्यामध्ये ज्येष्ठांसह सुमारे सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यात २१ कि.मी. खुला गट (१८ ते ३५ वयोगट), २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन, १० कि.मी., पाच किमी, तीन कि.मी. व दोन कि.मी. अंतराच्या गटात ही मॅरेथॉन घेण्यात आली. आमदार गणेश नाईक, सभागृहनेते रवींद्र इथापे, सभापती डॉ. जयाजी नाथ, नेत्रा शिर्के, स्टर्लिंग इन्स्टिट्यूटच्या सचिव पूर्वा वळसे-पाटील, विश्वस्त अशोक पाटील, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी उपस्थित यावेळी होते. याप्रसंगी आमदार नाईक यांनी उत्तम नागरी सुविधांप्रमाणे शिक्षण, आरोग्य व क्रीडा विषयक उपक्रमातून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात असल्याचे समाधान व्यक्त केले.>दिव्यांग जयश्री शिंदेचा विशेष सत्कारखुल्या गटात पुरुषांमधून विष्णू राठोरे व महिलांमधून साईगीता नायर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विष्णू यांनी २१ कि.मी.चे अंतर एक तास १० मिनिटे ५२ सेकंदात पार केले. तर साईगीताने १ तास ३४ मिनिटे ३५ सेकंदात अंतर पार केले. मॅरेथॉनमध्ये पायाने अधू असूनही दहा कि.मीची मॅरेथॉन जिद्दीने पार करणाऱ्या जयश्री शिंदे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्याशिवाय प्रत्येक गटाच्या स्पर्धेच्या विजेत्यांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.