नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सहा संशयित
By Admin | Updated: October 8, 2015 00:02 IST2015-10-08T00:02:33+5:302015-10-08T00:02:33+5:30
नवीन पनवेल परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, एकाच सोसायटीत सहा डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन जण एकाच घरातील असून, ते खांदा

नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सहा संशयित
कळंबोली : नवीन पनवेल परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, एकाच सोसायटीत सहा डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन जण एकाच घरातील असून, ते खांदा वसाहतीतील खासगी रु ग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सेक्टर - ६ येथील प्लॉट नंबर डी-१३ गिनी प्लाझा ही इमारत असून, या ठिकाणी राहणारे आनंद कुलकर्णी (३८), सुजना फ्रान्सेस (१०), अस्लम काळू (५५) यांना सुरुवातीला लागण झाली होती. त्यांनी खासगी रु ग्णालयात उपचार घेऊन आता ते घरी परतले आहेत. त्यानंतर एन. जे. कृष्णन (४३), कौशल्य कृष्णन (३५) समयुक्ता कृष्णन (१७) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. दिवा - पनवेल रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या या सोसायटीच्या जवळच गवत वाढलेले आहे. त्याचबरोबर बाजूला झोपडपट्टी असून, ते शौचास त्याच ठिकाणी बसतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात कचरा व डेब्रीज टाकण्यात येत आहे. बाजूलाच एमजेपीची जुनाट पाइपलाइन गेली असून, तिला फुटीचे ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे सतत दलदल निर्माण होऊन डासांची निर्मिती होते. यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे.
याबाबत माहिती मिळताच अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे, घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता मिलिंद भानगावकर, मिटकॉनचे मुख्य पर्यवेक्षक नितीन बागुल यांनी या सोसायटी परिसरात जाऊन पाहणी केली. हे रुग्ण डेंग्यूचे संशयित आहेत, तरीसुद्धा त्यांच्यावर डेंग्यूबाबत औषधोपचार करण्यात येत असल्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी सांगितले.