वाशीतील दरोड्यामध्ये सहा जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:07 IST2017-10-29T01:07:46+5:302017-10-29T01:07:59+5:30
वाशीतील मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी पडलेल्या दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एक महिलेसह सहा जणांचा समावेश

वाशीतील दरोड्यामध्ये सहा जणांचा समावेश
नवी मुंबई : वाशीतील मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी पडलेल्या दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एक महिलेसह सहा जणांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयावरून स्पष्ट झाले आहे. मिठाई देण्याच्या बहाण्याने दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून पिस्तूलच्या धाकाने १७ मिनिटांमध्ये २ कोटी ९ लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
नवी मुंबईमधील श्रीमंतांची वसाहत असलेल्या वाशी सेक्टर १७ मधील कुसुम अपार्टमेंटमधील व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरामध्ये ही घटना घडली. सहाही दरोडेखोरांचे चित्रीकरण उपलब्ध झाले आहे. अरुण व्यापारानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांची मुलगी व पत्नी दोघीच घरामध्ये होत्या. दुपारी ११ वाजून ३० मिनिटे झाली असताना एक महिला व पाच पुरुष इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील मेनकुदळे यांच्या सदनिकेजवळ गेले. चार जण जिन्यावर दबा धरून बसले. एक महिला व कुरिअर बॉय बनून आलेल्या पुरुषाने दरवाजा बेल दाबली. मेनकुदळे यांची मुलगी प्रीती यांनी दरवाजा उघडला. समोरील व्यक्तीने कुरिअरमधून आलेली भेटवस्तू त्यांच्या हातामध्ये ठेवली व घरामध्ये प्रवेश केला. दरवाजा उघडला असल्याचे निदर्शनास येताच जिन्यावर दबा धरून बसलेल्या इतर चौघांनीही पटकन घरामध्ये प्रवेश केला व दरवाजा लावून घेतला. रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून दोन्ही महिलांना खुर्चीला बांधून ठेवले. घरातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने, मोबाइल, २ लाख रुपये किमतीच्या बँकेतील मुदत ठेवीच्या पावत्या व इतर वस्तू असा तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांचा ऐवज बँगेत ठेवून पळ काढला.
दरोडा पडलेल्या सहाव्या मजल्यावरील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेºयांमध्ये दरोड्यादरम्यानचे क्षणचित्र चित्रित झाली आहेत. ११.३० वाजता घरामध्ये गेलेले पाचही दरोडेखोर १७ मिनिटांमध्ये सर्व साहित्य घेऊन बाहेर पडले. या दरम्यान बाहेर उभी असलेली महिला कोणी येत आहे का? यावर लक्ष ठेवून होती. दरोडा टाकणाºयांचे चेहरे स्पष्टपणे कॅमेºयांमध्ये दिसत असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. घटनेविषयी माहिती मिळताच श्वानपथक बोलावण्यात आले. ठसेतज्ज्ञांनी घरातील वस्तूंवर दरोडेखोºयांचे ठसे मिळतात का हे तपासण्यासाठी छायाचित्रे घेतली आहेत. गुन्हे शाखा, वाशी पोलीस स्टेशनसह परिमंडळ एकमधील तपासामध्ये गती असणाºया पोलिसांची पथके तयार करून दरोड्याचा तपास वेगाने सुरू केला आहे.
दरोड्याचा घटनाक्रम
११.३० : एक महिला व पाच पुरूष दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कुसुम अपार्टमेंटमध्ये आले.
११.३२ : लाल टी शर्ट घातलेला दरोडेखोर सहाव्या मजल्यावरील मेनकुदळे यांच्या वरील जिन्यावर गेला
११.३५ : चार दरोडेखोर जिन्यामध्ये लपून बसले व एक महिला व पुरूषाने घराची बेल वाजविली.
११.३६ : घरातील महिलेने दरवाजा उघडताच कुरिअर गिफ्ट आल्याचे सांगून ते त्यांच्या हातामध्ये दिले व घरात प्रवेश केला.
११.३७ : उघड्या दरवाजामधून इतर चारही दरोडेखोर पळतच आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतात.
११.४७ : दरोडेखोरांनी दागिने व इतर साहित्य बॅगेत भरून घरातून पळ काढला.
व्हिडीओ व्हायरल
वाशीमधील दरोड्याचे व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागले आहेत. अनेक दरोडेखोरांची छायाचित्रे स्पष्टपणे त्यामध्ये दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे दरोडेखोरांची ओळख लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची गती वाढविली आहे. तांत्रिक तपासावर भर
पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या चित्रीकरणावर, बोटांचे ठसे व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या परिसरातील मोबाइलवरील संभाषण तपासण्याचेही काम केले जात आहे. पाच पिशवी साहित्य
दरोडेखोरांनी घरातून एक प्रवासी बॅग, निळ्या रंगाची प्लास्टिकची मोठी पिशवी, दोन छोट्या सुटकेस व प्लास्टिक पिशवीमधून चोरी केलेला माल पळवून नेला आहे. शेवटच्या चोरट्याकडून एक पिशवी राहिल्याने त्याने दरवाजातून परत फिरून ती घेतल्याचे चित्र कॅमेºयामध्ये बंधिस्त झाले आहे.