भाईंदरमध्ये होणार सहा उड्डाणपूल

By Admin | Updated: November 26, 2014 02:10 IST2014-11-26T02:10:45+5:302014-11-26T02:10:45+5:30

(मीरा-भाईंदर) या मुख्य वाहतुकीच्या मार्गावर सहा ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी वाहतूक मार्ग व दोन पादचारी पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Six flyovers in Bhaindar | भाईंदरमध्ये होणार सहा उड्डाणपूल

भाईंदरमध्ये होणार सहा उड्डाणपूल

भाईंदर : पालिका हद्दीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (मीरा-भाईंदर) या मुख्य वाहतुकीच्या मार्गावर सहा ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी वाहतूक मार्ग व दोन पादचारी पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विकासकामांसाठी 4क् कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी एमएमआरडीएकडून  (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)कर्ज स्वरूपात मिळविण्याच्या प्रस्तावाला मंगळवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पालिका हद्दीतील वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्याप्रमाणात उपलब्ध रस्ते अपुरे आहेत. त्यातील  छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा एकमेव मुख्य मार्ग आहे. येथील काशिमिरा ते गोल्डन नेस्ट दरम्यान असलेल्या या मुख्य रस्त्याचा वापर मोठय़ाप्रमाणात होतो. तिथे वाहतूक कोंडीची समस्या जटील झाली आहे.  या मार्गावरील वाहतुकीतले अडथळे दूर व्हावे, आणि अपघातांचे प्रमाणही कमी व्हावे, म्हणून काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी 18 फेब्रुवारी 2क्13ला प्रशासनाकडे पुलासह अंडरपास (भुयारी वाहतूक मार्ग) व पादचारी पूल बांधण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालिन आयुक्त सुरेश काकणी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 19 जुलै 2क्14 च्या महासभेत प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी 5क् लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सहा ठिकाणी उड्डाणपुलासह भुयारी वाहतूक मार्ग व दोन पादचारी 
पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.  (प्रतिनिधी)
 
उड्डाणपूल आणि भुयारी मार्गासाठी 5क् लाखांचा निधी देण्यात आला होता. तो अपुरा असून 4क् कोटींच्या निधीची आवश्यकता वर्तविण्यात आली. हा निधी उभारण्यासाठी पालिका सक्षम नाही. त्यामुळे एमएमआरडीए अथवा खासगी वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात निधी देण्यात यावा, असा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत सादर करण्यात आला होता. त्यावर झालेल्या चर्चेत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी एमएमआरडीएकडून कर्ज नामंजूर झाल्यास ते खासगी वित्तीय संस्थांमार्फत न घेता शासकीय अथवा निमशासकीय वित्तीय संस्थांकडून मिळविण्याची सूचना केली. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. 

 

Web Title: Six flyovers in Bhaindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.