चोरीच्या संशयातून भाच्याची हत्या
By Admin | Updated: October 26, 2014 01:27 IST2014-10-26T01:27:00+5:302014-10-26T01:27:00+5:30
किसन सुरेला (वय35)याने पत्नी अनिता आणि भाचा रोहीत जखवाडीया (वय12) या दोघांवर धारदार शस्त्रने वार केल्याची घटना ठाकुर्ली चोळेगाव परिसरात घडली.

चोरीच्या संशयातून भाच्याची हत्या
डोंबिवली : फुल विक्रीच्या धंद्यातील दोन हजार रुपये चोरल्याच्या संशयावरून किसन सुरेला (वय35)याने पत्नी अनिता आणि भाचा रोहीत जखवाडीया (वय12) या दोघांवर धारदार शस्त्रने वार केल्याची घटना ठाकुर्ली चोळेगाव परिसरात घडली. यात रोहीतचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या अनितावर मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी
किसनला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
किसनचा फुल विक्रीचा धंदा आहे. त्याने मदतीसाठी भाचा रोहीत याला नालासोपारा येथून आणले होते. गुरुवारी रात्री उशीरा पैसे चोरीच्या संशयातून किसनचे पत्नी अनिता आणि भाचा रोहीत याच्याशी कडाक्याचे भांडण झाले. त्याने तीक्ष्ण हत्याराने अनिताच्या डाव्या कानशिलावर वार करून तिला ठोशा बुक्यांनी बेदम
मारहाण केली तर भाचा रोहीत याच्याही गालावर, कानावर आणि डोक्यावरही हत्याराने वार केले यात रोहीतचा जागीच मृत्यू झाला तर अनिता गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणात अटक असलेल्या किसनला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 29 ऑक्टोबर 2क्14 र्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)