शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

साहेब काहीही करा, पण आयसीयूसह व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 1:32 AM

वॉर रूममध्ये फोनचा वर्षाव : पालिकेची हेल्पलाइन ठरतेय नागरिकांना आधार

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रुग्णवाहिका व बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या वॉर रूममधील हेल्पलाइन नंबरवर फोनचा वर्षावर होऊ लागला आहे. प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक संपर्क साधत आहेत. साहेब काहीही करा, पण आयसीयूसह व्हेंटिलेटर्स उपलब्ध करा, अशी विनंती अनेक नागरिक करत आहेत. वॉर रूममधील डॉक्टर्स रुग्णांची माहिती घेऊन त्यांना लक्षणांप्रमाणे बेड उपलब्ध करून देत असून सर्वसामान्य नागरिकांसाठी मनपाची हेल्पलाइन आधार ठरत आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ५ एप्रिलपासून हेल्पलाइन नंबर सुरू केला. मनपाच्या डॅशबोर्डवरही नंबर आहे. आतापर्यंत २,४४६ जणांनी बेडसाठी संपर्क केला. सुरुवातीला प्रतिदिन ६० ते ७० जण संपर्क करत होते. या आठवड्यात प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक संपर्क करत आहेत. चोवीस तास ही सुविधा सुरू आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी फोन केल्यानंतर डॉक्टर्स लक्षणे समजून घेतात. लक्षणांप्रमाणे कोणता बेड द्यायचा याचा निर्णय घेतला जातो. बेड कुठे उपलब्ध आहे हे पाहून तो मिळवून देईपर्यंत पाठपुरावा करण्यात येत आहे.प्रत्येक शिफ्टमध्ये ११ जणांची टीममहानगरपालिकेच्या वॉर रूमचे कामकाज २४ तास सुरू ठेवण्यात येत आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये ३ डॉक्टर्स व ८ ऑपरेटर तैनात करण्यात येत आहेत. ऑपरेटर फोन घेऊन आवश्यकतेप्रमाणे तो डॉक्टरांकडे देतात. डॉक्टर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांशी बोलून उपचाराची दिशा ठरवतात. तीन शिफ्टमध्ये वॉर रूममधील काम चालत आहे. बेड, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णांनी फोन केल्यानंतर प्रत्यक्ष बेड मिळवून देईपर्यंत फाॅलोऑफ वॉर रूमधून घेण्यात येत आहे.

कोणाला व्हेंटिलेटर्स हवे तर कोणाला रुग्णवाहिकामनपाच्या हेल्पलाइनवर रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात संपर्क साधत आहेत. यामधील बहुतांश नागरिकांना आयसीयू बेड व व्हेंटिलेटर्स हवा आहे. साहेब लवकर बेड मिळवून द्या नाही तर रुग्णाचा जीव जाईल, अशी सादही घातली जात आहे. अनेकांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते, तर काहींना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. सर्वाधिक फोन आयसीयू व व्हेंटिलेटरसाठी येत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून मनपाचे डॉक्टर्स आवश्यक ते बेड व रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहेत.अत्याधुनिक सुविधावॉर रूममधील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणक, प्रिंटर, वातानुकूलित दालन, कुलर, बोलण्यासाठी माईक व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांवर ताण येऊ नये यासाठी तीन शिफ्टमध्ये हे काम केले जात आहे.

रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून देण्यासाठी वॉर रूममध्ये स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. रुग्णांनी फोन केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून प्रत्यक्ष बेड मिळवून देण्यापर्यंत पाठपुरावा केला जात असून सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक या नंबरवर फोन करत आहेत.- अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnmmcनवी मुंबई महापालिका