शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:06 AM

१२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

- वैभव गायकर पनवेल : १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अर्धवट कामे, बंद पथदिवे तसेच अस्तित्वात नसलेल्या लेनच्या पट्ट्या आदीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दीड वर्षात या मार्गावर तब्बल २५० अपघात झाले असून, यात जवळपास १०३ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.१८ किलोमीटरच्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग हा एक आहे. या मार्गावरून दररोज पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचा ढोबळ अंदाज वर्तविला जातो. या मार्गावर सानपाडा, नेरु ळ, उरणफाटा, कामोठे व खारघर अशा पाच उड्डाणपुलाचा समावेश आहे. मागील वर्षी पहिल्या पावसातच या सर्व उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावर अधिक अपघात घडतात. आरटीआय कार्यकर्ता दीपक सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून २०१६-१७ या वर्षात या मार्गावर तब्बल २४२ लहान-मोठे अपघात झाले आहेत. तर चालू वर्षात म्हणजेच मागील सहा महिन्यांत जवळपास ५० अपघात घडले असून, यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. उड्डाणपूल व रस्त्याच्या दुभाजनाबाबत अनेक ठिकाणी कोणत्याच सूचना अथवा उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे उड्डाणपुलाला धडकणाऱ्या वाहन अपघातांचे प्रमाण अधिक आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला होता. या कंपनीचा ठेका रद्द करून सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम खातेच या मार्गावरून टोल वसूल करीत आहेत. याकरिता इगल इन्फ्रा ही खासगी कंपनी टोल वसूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. दररोज लाखो रु पयांची टोल वसूल करूनदेखील या मार्गावरील समस्या वाढतच चाललेल्या आहेत. अनेक ठिकाणी उडाणपुलाखालील भुयारी मार्ग बंद असून, त्यामध्ये पाणी शिरले आहे. मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने एक लेन पूर्णपणे पाण्यात जाते. खारघर टोलनाक्यावर पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी नेहमीच साचलेले पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, अपघातांच्या संख्येत वाढ होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत योग्य पावले उचलताना दिसून येत नाही.दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी एक कन्सल्टन्सी नेमलेली आहे. त्यावरून कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी पुढे पाठविले जाईल, तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याची अटीवर दिली.>या मार्गावरील अर्धवट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला २०पेक्षा जास्त पत्रे लिहिली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज अपघातांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नजीकच्या काळात याबाबत सुधारणा झाली नाही, तर उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करणार.- दीपक सिंग,माहिती अधिकार कार्यकर्ता>मागील सहा महिन्यांत दहा जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर अपघातांची संख्या ५०च्या वर गेलेली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.>२०१६-१७ मधील अपघातांचा आढावाअपघात मृतपनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर १८ ०७नेरु ळ ३४ १४सानपाडा ०७ ११वाशी ७६ १३