पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत

By वैभव गायकर | Updated: March 22, 2025 12:17 IST2025-03-22T12:16:33+5:302025-03-22T12:17:27+5:30

प्रायोगिक तत्वावर पालिकेने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती

Signal system at Panchmukhi Chowk in Panvel is in Devanagari | पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत

पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत

पनवेल:पनवेल महानगरपालिकेने मराठी बाणा जागा करीत सायन पनवेल महामार्गावरील पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत कार्यान्वित केली आहे.सिग्नल वर थांबल्यावर बोर्डवर देवनागरीत आकडे वाहन चालकांना दिसतात तसेच या बॉर्डवर थांबा ,जा असे मराठी वाहन चालकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

प्रायोगिक तत्वावर पालिकेने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे अभियंता प्रीतम पाटील यांनी सांगितले.या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.मराठी हि राज्याची अधिकृत भाषा आहे.महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत अधिक प्रयत्न करावेत अशा सूचना आहेत.
 

Web Title: Signal system at Panchmukhi Chowk in Panvel is in Devanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.