सिडकोत भाटिया यांच्या बदलीच्या वृत्ताने अस्वस्थता

By Admin | Updated: March 7, 2016 02:40 IST2016-03-07T02:40:55+5:302016-03-07T02:40:55+5:30

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. असे असले तरी सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत

Siddkot Bhatia's replacement reports disorder | सिडकोत भाटिया यांच्या बदलीच्या वृत्ताने अस्वस्थता

सिडकोत भाटिया यांच्या बदलीच्या वृत्ताने अस्वस्थता

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. असे असले तरी सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत मात्र या वृत्ताने अस्वस्थता पसरली आहे. कोणत्याही स्थितीत भाटिया यांची बदली होऊ नये, असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
शिस्तप्रिय व कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून भाटिया यांची ओळख आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती होऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यकाळात भाटिया यांनी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली आहे. जमीन घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या या महामंडळाची प्रतिमा सुधारण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जमीन संपादन, त्याबदल्यात द्यावयाचा मोबदला, निविदा प्रक्रिया क्लिष्ट वाटणारे हे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आता केवळ विमानतळाची आर्थिक पात्रता दर्शविणारी निविदा काढणे शिल्लक आहे. विमानतळाबरोबरच देशातील पहिली स्मार्ट सिटी आणि नैना प्रकल्पाच्या विकासाचे काम भाटिया यांनी हाती घेतले आहे. हे सर्व प्रकल्प हाताळताना भाटिया यांनी सिडकोतील आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतले. कर्मचाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले.
गेल्या चाळीस वर्षांच्या इतिहासात सिडकोत असे प्रथमच घडल्याने भाटिया यांनी आणखी काही काळ सिडकोत कार्यरत राहावे, अशी अधिकारी व कर्मचारीवर्गाची भावना आहे. या महिन्याच्या अखेरीस भाटिया यांना सिडको सेवेत तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांची बदली अटळ असल्याचे मानले जात आहे. परंतु या नियमालाही अपवाद आहेत. सिडकोने हाती घेतलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाटिया यांना मुदतवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची सुप्त इच्छा आहे.

Web Title: Siddkot Bhatia's replacement reports disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.