शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:35 IST

Navi Mumbai Fire: खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला.

 नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला. तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. 

सकाळी १० च्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रिज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर, डांबरगोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना एका मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला मात्र, काही क्षणात कापरच्या पावडरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगरांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूरसाठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या दोन कंपन्यांमध्ये आग पसरली. 

आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी, पालिका, ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे-मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, कापूर व डांबरगोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

पाण्याचा तुटवडाआग आटोक्यात आणण्यासाठी सातहून अधिक बंब तर २० हून अधिक टँकर बचावकार्यात गुंतले होते. बचावकार्य सुरू असताना पहिल्या तासातच पाण्याचा तुटवडा भासून त्यात खंड पडला. अखेर परिसरातल्या कंपन्यांमधून पाणी घेऊन पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली. त्यातही टाकीतले  पाणी थेट बंबात सोडता येत नसल्याने अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आगीच्या झळाआग शमविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या थेट तोंडावर आगीच्या झळा बसत होत्या. अचानक आगीचा भडका उडत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये काहींच्या डोळ्यांना तसेच चेहऱ्यावर किरकोळ दुखापती झाल्या आहेत. 

पाण्यामुळे आणखी पसरली आगआग शमविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. कंपनीतून बाहेर येणाऱ्या त्या पाण्यासोबत कापूर व केमिकलदेखील वाहू लागले. या रसायनमिश्रित पाण्यानेही पेट घेतला. हे पाणी लगतच्या गोयंका व जस्मिन आर्ट या दोन कंपन्यांमध्ये वाहत गेल्याने तिथेही आग लागली. शिवाय रस्त्यालगतचे महावितरणचे विद्युत ट्रान्स्फार्मरदेखील जळाले. अखेर अग्निशमन दलाने फोमचा वापर करून रस्त्यावरून वाहणारे आगीचे लोट नियंत्रणात आणले.

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई