रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे

By Admin | Updated: December 12, 2015 02:34 IST2015-12-12T02:34:48+5:302015-12-12T02:34:48+5:30

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे दुकाने बांधण्यात येणार असून,

Shops and houses to the obstacles in road widening | रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे

सदानंद नाईक, उल्हासनगर
रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे दुकाने बांधण्यात येणार असून, इमारतीमधील प्लॉटधारकांना आरक्षित भूखंडावर वसविण्यात येणार आहे.
उल्हासनगर पालिकेने कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रुंदीकरण हाती घेतले असून, १०१० जण बाधित होणार आहेत. त्यापैकी २६८ दुकाने व १६८ घरे १०० टक्के बाधित होत असल्याने त्यांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव शिवसेना, भाजपा, रिपाइं, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने आणला. साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी दुसरा ठराव आणून व्यापाऱ्यांना लवकरात लवकर पर्यायी दुकाने मिळण्याची मागणी केली.
व्यापाऱ्यांनी कोट्यवधी किमतीचे दुकाने स्वत:च्या हाताने तोडली आहे. त्यांनी दाखविलेल्या मोठ्या मनाचा मान राखून व त्यांचे उघड्यावर पडलेले संसार सावरण्यासाठी त्यांना पर्यायी जागा देणे गरजेचे असल्याचे मत
सेनेचे धनंजय बोडारे यांनी व्यक्त
केले. साई पक्षाचे जीवन इदनानी, रिपाइंचे भगवान भालेराव, सेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, माजी महापौर राजश्री चौधरी, बी. बी. मारे,
सुरेश जाधव, सुभाष मनसुलकर, भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामणी, डॉ. नीना नाथानी, राष्ट्रवादीचे ओमी कालानी, मनोज लासी यांनी चर्चेत भाग घेऊन पर्याय सूचविले आहेत.
>> कल्याण-अंबरनाथ महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधित तसेच यापूर्वी ३३ रस्त्यांच्या व भविष्यात रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना पर्यायी दुकाने व घरे मिळावी, आरक्षित भूखंड व इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागी २०० स्केअरफुटाचे २०० गाळे बांधून ९९ वर्षांच्या करारनाम्यावर देणे, दरमहा ३०० रुपये नाममात्र भाडे व जुनेच मालमत्ता कर असा सर्वपक्षीय ठराव रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी वाचून दाखविला. त्यावर मतदान होऊन बहुमताने ठराव मंजूर झाला.
बाधितांसाठी स्वतंत्र कक्ष : रस्ता रुंदीकरणातील बाधितांची ग्राऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष उघडण्यात येणार आहे. बाधित व्यापारी व इमारतीमधील प्लॉटधारकाच्या समस्या कक्षामार्फत सोडविण्यात येणार असून आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचे त्यावर नियंत्रण असेल.
रस्त्याचे काम जलद : महापालिका महासभेने मंजूर केलेला ठराव शासनाला पाठविण्यात येणार आहे. बाधितांना न्याय देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी महासभेत सांगितले. महिन्यापूर्वी रस्त्याच्या अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरू करून फुटपाथ बांधण्यात येईल. विद्युत महामंडळाला पत्र देऊन विद्युत खांब व वाहिन्या बदलविण्यात येईल आहेत.

Web Title: Shops and houses to the obstacles in road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.