व्यापाऱ्यांनी घेतला कारवाईचा धसका
By Admin | Updated: June 16, 2016 01:22 IST2016-06-16T01:22:26+5:302016-06-16T01:22:26+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. तसेच मार्जिनल स्पेस बळकावणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तंबी दिली आहे. याचा चांगलाच धसका व्यापाऱ्यांनी

व्यापाऱ्यांनी घेतला कारवाईचा धसका
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. तसेच मार्जिनल स्पेस बळकावणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तंबी दिली आहे. याचा चांगलाच धसका व्यापाऱ्यांनी घेतला असून, अनेकांनी स्वत:हून मार्जिनल स्पेसच्या जागा मोकळ्या करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
शहरातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसच्या जागा बळकाल्या आहेत, तर फेरीवाल्यांनी पदपथांवर बस्तान मांडले आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त मुंढे यांनी मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बहुतांशी पदपथ मोकळे झाल्याचे दिसून येते. फेरीवाल्यांबरोबरच मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांवरही आयुक्तांनी आपली नजर रोखली आहे. संबंधित व्यापारी व हॉटल्सचालकांना ठरावीक मुदतीत मार्जिनल स्पेसवरील ताबा काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एरव्ही महापालिकेच्या कारवाईला भीक न घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता स्वत:हून मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण तोडायला घेतले आहे. वाशी सेक्टर १७ येथील बिग स्प्लॅस इमारतीतील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर वाढविलेले चौथरे स्वत:हून तोडण्याचे काम हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)