शिवसेनेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे

By Admin | Updated: July 6, 2017 06:41 IST2017-07-06T06:41:47+5:302017-07-06T06:41:47+5:30

पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अक्षम्य खेळखंडोबा सुरू आहे. सतत वीजप्रवाह खंडित होत असतो. त्यामुळे शिवसेनेचे

Shivsena's office rejected Mahavitaran's office | शिवसेनेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे

शिवसेनेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अक्षम्य खेळखंडोबा सुरू आहे. सतत वीजप्रवाह खंडित होत असतो. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली पनवेलच्या महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कार्यालय निरुपयोगी असल्याने टाळे ठोकले.
पायोनियर विभाग, टपाल नाका, कोळीवाडा, बावन बंगला, कच्छी मोहोल्ला, बंदर रोड या भागात दिवसभरातून अनेकदा अनेक तास वीज नसतेच. पनवेल आता महानगरपालिका झाली आहे. एअरपोर्टसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोजेक्ट्स येथे येत आहेत. अशा परिस्थितीत अखंडित वीज मिळणे ही पनवेलकर जनतेची मूलभूत अपेक्षा आहे. वीजवाहिन्या भूमिगत करणेकामी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पालिकेकडेही सेनेने पाठपुरावा दोन महिन्यांपूर्वीच सुरु केला आहे. तेव्हा आता निर्वाणीची वेळ आली असून जर आपण आवश्यक त्या सुधारणा योग्य वेळी केल्या नाहीत तर जनतेचा संयम राहणार नाही. तेव्हा जर आपणाला काही काम करायचे असेल तर ताबडतोब ही समस्या निकाली काढा नाहीतर टाळे लावून आपले पनवेल महावितरणचे कार्यालय बंद तरी करून टाका, अन्यथा शिवसेनेला ते करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रथमेश सोमण यांनी या वेळी दिला.
या वेळेस पनवेल शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून विजेचा खेळखंडोबा थांबवा, शहरातील वीजवाहिन्या लवकरात लवकर भूमिगत करा, कार्यालयातील दूरध्वनी चालू अवस्थेत ठेवून त्यावर कायम एक अटेंडंट ठेवा, पनवेलमध्ये विभागानुसार अधिकाऱ्यांना तक्रारींसाठी मोबाइल देऊ करून त्यांचे नंबर सार्वजनिक जाहीर करा , नागरिकांना तुम्ही पाठवत असलेली अव्वाच्या सव्वा बिले तपासून योग्य ती बिलेच द्या, शहरात आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवावा, जुने पोल, खराब फ्युज रिप्लेस करा, उघड्या डीपीजवर झाकणे बसावा इत्यादी या मागण्यांच्या निवेदनासह कुलूपही भेट दिले. या वेळेस जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, महिला उपजिल्हा संघटक सीमा मानकामे, शहर संघटक अच्युत मनोरे, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, प्रवीण जाधव, अनिल कुरघोडे, विभागप्रमुख यतीन मानकामे, भरत कल्याणकर, रवींद्र पडवळ, सुजन मुसलोडकर, उपविभागप्रमुख राजेंद्र भगत, मंदार काणे, शाखाप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसाद सोनावणे, राजेश बतले, दत्तात्रय फडके, युवासेनेचे अक्षय नरसाळे, तबरेज मास्टर कामगार संघटनेचे अनित गागडा, प्रदीप इंदवटकर व इतर पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Shivsena's office rejected Mahavitaran's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.