शिवसेनेला भोवली अनधिकृत बॅनरबाजी
By Admin | Updated: May 16, 2017 00:53 IST2017-05-16T00:53:29+5:302017-05-16T00:53:29+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीत पालिका क्षेत्रात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भरारी पथकाने सोमवारी शिवसेनेने

शिवसेनेला भोवली अनधिकृत बॅनरबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत पालिका क्षेत्रात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भरारी पथकाने सोमवारी शिवसेनेने नवीन पनवेलमध्ये विनापरवाना लावलेल्या अनधिकृत बॅनर्स प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे .
नवीन पनवेलमध्ये रस्त्यालगतच्या वीज खांबाला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर्स लावले होते. भरारी पथकाला यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित बॅनर्स हटविले. विशेष म्हणजे या प्रकरणी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्याचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आचारसंहिता पथक प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली. नवीन पनवेल उड्डाणपुलावर हे बॅनर्स लावण्यात आले होते.