आलाना तेल कंपनीविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा
By Admin | Updated: November 26, 2014 22:47 IST2014-11-26T22:47:21+5:302014-11-26T22:47:21+5:30
अलाना तेल कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून स्थानिक कामगार भरती प्रश्नी सेना पुढील आठवडय़ात कंपनीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिला आहे.

आलाना तेल कंपनीविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा
खालापूर : अलाना तेल कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून स्थानिक कामगार भरती प्रश्नी सेना पुढील आठवडय़ात कंपनीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिला आहे. अलीकडे राष्ट्रवादीकडून आंदोलन झाल्यानंतर आता सेना आंदोलन करणार असल्याने कंपनी प्रशासनाची मुजोरी चव्हाटय़ावर आली आहे.
आंदोलनात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणो सहभागी होणार आहेत. खालापूर तालुक्यातील पेण खोपोली रस्त्यावरील सारसन येथे उभी राहिलेली अलाना तेल कंपनी सुरुवातीपासून वादात सापडली आहे. स्थानिक भरतीबाबत ग्रामपंचायतीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सारसन, साजगाव आणि ढेकू गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी ग्रामपंचायतीला घेऊन ऑगस्ट महिन्यात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनकर्ते आणि प्रशासनात झालेल्या चर्चेत गावातील बेरोजगार तरुणांना कंपनीने सामावून घेतले. मात्र कंपनीचा आवाका पाहता साजगाव ग्रामपंचायतीतील गावांमध्ये शेकडो तरुण आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. अलीकडे शेकाप-सेना यांच्या कार्यकत्र्यानी कंपनी व्यवस्थापनाला भेटून स्थानिक भरतीची मागणी केली होती. मात्न केवळ आश्वासन देण्यापलीकडे कंपनीने काहीच केले नसल्याने सेनेचे कार्यकर्ते कंपनीविरोधात आक्रमक झाले आहेत.
सेनेच्या इशा:यानंतर कंपनी प्रशासन हादरले असून मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर कंपनी गेटवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)
व्यवस्थापन गप्प
च्स्थानिक भरतीसह अनेक प्रश्नांवर कंपनीविरोधात पुढील आठवडय़ात सेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणो यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक कंपनी गेटवर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिली आहे.