स्थायी समितीवरून शिवसेनेत संघर्ष

By Admin | Updated: April 23, 2017 03:45 IST2017-04-23T03:45:57+5:302017-04-23T03:45:57+5:30

स्थायी समितीवर सदस्य नियुक्तीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या गटामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असून १५ नगरसेवकांनी

Shiv Sena fight from Standing Committee | स्थायी समितीवरून शिवसेनेत संघर्ष

स्थायी समितीवरून शिवसेनेत संघर्ष

नवी मुंबई : स्थायी समितीवर सदस्य नियुक्तीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या गटामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असून १५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.
नवी मुंबई शिवसेनेमधील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. स्थायी समितीवर पाच सदस्य नियुक्त करण्यासाठी खासदार व पालकमंत्री यांनी एक यादी व उपनेते विजय नाहटा यांनी एक यादी सादर केली. तहकूब सभेमध्ये नावे निश्चित केली जाणार असल्याने पुन्हा यादी बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते विजय चौगुले व त्यांच्या मर्जीतील नगरसेवकांची नावे असलेली यादी बदलून नवीन सदस्यांना संधी देण्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. यासाठी जवळपास १५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे. बेलापूर विधानसभा संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याजवळ नगरसेवकांनी राजीनामे सादर केल्याची चर्चा आहे. चौगुले व त्यांच्या समर्थकांची नावे वगळण्यासाठी हे दबावतंत्र सुरू आहे. दुसरीकडे चौगुले व त्यांच्या समर्थकांनीही पालकमंत्र्यांनी नावे निश्चित केली असताना उपनेते त्यांची मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेने दुसऱ्यांदा स्थायी समिती सभापतीपद व महापौरपद मिळविण्याचा निर्धार केला होता. पण सदस्य निवडीमध्येच एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे. शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून ही फूट थांबविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाले आहे. याविषयी विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला पण संपर्क होवू शकला नाही.

Web Title: Shiv Sena fight from Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.